मृतदेह Dainik Gomantak
गोवा

Colva: कोलवा येथील हॉटेलमध्ये आढळला अमेरिकन नागरिकाचा मृतदेह

सहा महिन्यांपूर्वी बांबोळी येथील हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका निवासी हॉटेलमध्ये विदेशी नागरिकाचा मृतदेह आढळून आला. मूळ अमेरिकन नागरिक असलेल्या या व्यक्तीचे रॉबर्ट कार्लोस दुमास (82) असे नाव आहे. कोलवा येथील निवासी हॉटेलच्या रूममध्ये रॉबर्ट अत्यवस्थ अवस्थेत आढळल्याने त्यांना मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोलवा पोलिसांनी ही माहिती दिली.

रॉबर्ट दुमास याच्यावर सहा महिन्यांपूर्वी बांबोळी येथील हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी अमेरिकन दूतावासाला सूचित केले असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. त्याचा मृतदेह मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलच्या शवागरात ठेवण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय युवकाला अटक

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय युवकाला फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र ओरॉन (रा. झारखंड) असे या युवकाचे नाव आहे. ऑगस्टमध्ये युवकाने या मुलीवर बलात्कार केला होता. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT