Bicholim Project Dainik Gomantak
गोवा

Bicholim Project : डिचोलीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण; मुख्यमंत्री, आमदार शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत गुरूवारी लोकार्पण

Bicholim Project : हा चारपदरी बगलमार्ग लोकार्पणासाठी सज्ज आहे,अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Project :

डिचोली, गेल्या जवळपास तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला राज्य महामार्ग-१ अंतर्गत येणारा डिचोली शहरातील चारपदरी बगलमार्ग अखेर पूर्ण झाला आहे. येत्या गुरुवारी (ता.६ जून) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

हा चारपदरी बगलमार्ग लोकार्पणासाठी सज्ज आहे,अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली आहे.

गुरुवारी सकाळी १०.३० वा. आयोजित खास सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते या बगलमार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पीडब्ल्यूडीचे प्रधान मुख्य अभियंता आत्माराम गावडे आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी उपस्थित राहणार आहेत. ४.२ किमी. अंतराचा हा चारपदरी बगलमार्ग आहे. या बगलमार्ग प्रकल्पावर ७५ कोटी हून अधिकचा खर्च करण्यात आला आहे.

व्हाळशी ते वाठादेवपर्यंतचा हा बगलमार्ग शहरातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली होती. या बगलमार्गासाठी रोलिंगमिल-वाठादेव परिसरातील काही घरांवरही बुलडोझर फिरविण्यात आला आहे. या बगलमार्गावर दोन लहान मिळून तीन पूल तर दोन ओव्हरब्रीज येत आहेत.

या पुलांचे कामही पूर्ण झाले आहे. व्हाळशी आणि वाठादेव येथे मुख्य रस्त्याला जोडून असलेल्या जंक्शनवर विभाजक बसवून सर्कलही करण्यात आली आहेत. या चारपदरी बगलमार्गावरुन वाहतूक सुरु झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होताना अपघात आदी वाहतूक समस्येवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. शहराबाहेर जाणाऱ्या अवजड वाहनांना हा बगलमार्ग किफायतशिर ठरणार आहे.

धोकादायक दरडीचा बंदोबस्त करा

शहरातील चारपदरी बगलमार्ग पूर्ण झाला असला, तरी या बगलमार्गाच्या बाजूने दोन ते तीन ठिकाणी धोकादायक आणि खचलेल्या अवस्थेत दरडी आहेत. या दरडी कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. पावसाळ्यात त्याचा अधिक धोका संभवत आहे.

धोका टाळण्यासाठी या दरडीचा बंदोबस्त करावा. सभोवताली जाळी मारावी. अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. बगलमार्गाच्या लोकार्पणापूर्वी की नंतर ही उपाययोजना करण्यात येते, ते पहावे लागणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT