Calangute Goa: गोव्यात येणाऱ्या पर्टकांसाठी महत्वाची बातमी, हॉटेल बुकींग असेल तरच आता कळंगुटमध्ये एन्ट्री

Calangute Goa: मुलगी देण्याचे आमिष दाखवत गुजरातच्या पर्यटकाची फसवणूक केल्याचा प्रकार कळंगुट येथे उघडकीस आला होता.
Calangute Beach
Calangute BeachDainik Gomantak

Calangute

कळंगुटमध्ये गुजरातच्या पर्यटकासोबत झालेल्या फसवणुकीच्या प्रकारानंतर पंचायत अधिक सक्त झालीय. यापुढे कळंगुटमध्ये प्रवेश करताना हॉटेल बुकींग असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे. यासह पंचायत विविध नियम लागू करणार असल्याची माहिती सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिली आहे.

जोसेफ सिक्वेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ऑक्टोबरपासून कळंगुट पंचायत कडक नियम लागू करणार आहे. पर्यटकांना हॉटेल बुकींग असल्याशिवाय या भागात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, कळंगुटमध्ये चार प्रवेश ठिकाणांवर तपासणी नाके उभारले जाणार आहेत, असे सक्वेरा म्हणाले.

तसेच, कळंगुटमध्ये 80 टक्के गेस्ट हाऊस परप्रांतीय लोकांना भाड्याने दिल्याचे सिक्वेरा म्हणाले.

Calangute Beach
Goa Tenant Verification: 500 जण सापडले विनाकागदपत्राशिवाय; उत्तर गोव्यात पाच हजार जणांची पडताळणी

गुजरातच्या पर्यटकाची फसवणूक करुन पैसे उकळल्याप्रकणी पोलिसांनी कळंगुट येथील दोन दलालांना अटक केली. तसेच, याप्रकरणी वादात सापडलेल्या क्लबला देखील टाळे ठोकण्यात आले आहेत. पोलिसांनी क्बच्या मालकाविरोधात कारवाई सुरु केली आहे.

दरम्यान, गुजरातच्या पर्यटकाला मुलगी देण्याचे आमिष दाखवत क्लबमध्ये घेऊन जात पैसे उकळल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गोमन्तकने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. तसेच, क्लब देखील सील केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com