Lata Mangeshkar Dainik Gomantak
गोवा

‘अमर लता’ मैफलीला कुडचडेत ‘चार चांद’

गोमन्तक वितरकांचा सन्मान: मंत्री नीलेश काब्राल यांची उपस्थिती

दैनिक गोमन्तक

मडगाव: गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगितिक श्रद्धांजली वाहण्यासाठी दैनिक ‘गोमन्तक’ने आयोजित केलेल्या ‘अमर लता’ या कार्यक्रमाला कुडचडे येथील रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दै. ‘गोमन्तक’ला 60 वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ शुक्रवारी साखळी येथे, तर आज कुडचडे येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कुडचडेच्या रवींद्र भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला साबांखा मंत्री नीलेश काब्राल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘गोमन्तक’च्या आतापर्यंतच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचललेल्या दक्षिण गोव्यातील प्रमुख वृत्तपत्र वितरकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर कुडचडेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई, ज्येष्ठ हार्मोनियमवादक शिवराय फोंडेकर, गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक आणि मान्यवर उपस्थित होते.

संगीत मैफलीला रसिकांची दाद

सांगितिक कार्यक्रमात मंदार आपटे, रसिका गानू आणि प्रीती वोरियार यांनी लता दीदींची एकाहून एक सरस गाणी गाऊन रसिकांची मने जिंकली. लता दीदींच्या हिंदी आणि मराठी गाण्यांची ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. अनेक गाण्यांना रसिकांकडून वन्समोअर मिळाला. या कार्यक्रमाला समीरा गुजर जोशी यांचे समर्पक सूत्रसंचालन लाभले. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी कुडचडेसह सांगे, केपे, मडगाव व फोंडा येथून रसिक आले होते.

गोव्याच्या प्रशासनाला योग्य वळण देण्यासाठी आजवर ‘गोमन्तक’ने जे योगदान दिले, ते असामान्य आहे. मुक्तीनंतर गोवा घडवायचे काम या वृत्तपत्राने केले. साठ वर्षे पूर्ण केलेल्या ‘गोमन्तक’ने शंभरी पूर्ण करावी.

- नीलेश काब्राल, मंत्री, साबांखा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT