Altone DCosta Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांना आमिष देण्याचा भाजपचा प्रयत्न; काजूला 175 रुपये MSP देण्याच्या मागणीवरुन डिकोस्ता आक्रमक

Altone DCosta: गोव्यातील काजूला 175 रु. प्रति किलो आधारभूत किंमत द्यावी अशी मागणी मी गेल्या दोन वर्षांपूर्वी केली होती.

Manish Jadhav

Altone DCosta: गोव्यातील काजूला 175 रु. प्रति किलो आधारभूत किंमत द्यावी अशी मागणी मी गेल्या दोन वर्षांपूर्वी केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी विभागाने काजूला रु. 170 रुपये आधारभूत किंमत देण्याचा प्रस्ताव पुढे केला असल्याचे समजते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब ₹175 प्रति किलो दराची अधिसूचना जारी करावी आणि त्याचे श्रेय केवळ काँग्रेस पक्षाला द्यावे, अशी मागणी केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी केली आहे. कृषी विभागाने काजूला 170 रुपये आधारभूत किंमत देण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना एल्टन डिकोस्ता यांनी निवडणुकीत फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना आमिष देण्याचा भाजपचा हा निवडणुक जुमला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

हिम्मत असेल तर सरकारने त्वरित अधिसूचना जारी करावी. परंतु, माझ्या आणि काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच भाजप सरकारला आधारभूत किंमत वाढवण्यास भाग पाडले हे सत्य आहे, असा दावाही डिकोस्ता यांनी केला. मी काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान काजू शेतकऱ्यांची दुर्दशा दाखवली होती. गोव्यातील लोकांनी त्या व्हिडीओमध्ये मागणी नसल्यामुळे काजूबीयांसह काजूचे फळ कसे सडायला सोडले जाते हे पाहिले होते. दुर्दैवाने, शेतकरी रडत असताना सरकार कार्यक्रम साजरे करण्यात व्यस्त राहिले, असा घणाघात डिकेस्ता यांनी केला.

भाजप सरकारने जुमलेबाजीच्या कलेवर प्रभुत्व मिळवले आहे. हे सरकार मोठमोठ्या घोषणा करते पण अंमलबजावणीच्या नावाने ठणठण गोपाळा. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीत 35 टक्के उत्तीर्ण होण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे, असे एल्टन डिकोस्ता यांनी नमूद केले. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, जोपर्यंत 175 रुपये प्रति किलो आधारभूत किंमत असलेली अधिसूचना जाहीर होत नाही आणि वास्तविक पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवू नका, असेही शेवटी डिकोस्ता म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT