Goa: हॉस्पिसियोची जुनी इमारत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत Dainik Gomantak
गोवा

Goa: हॉस्पिसियोची जुनी इमारत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत

इमारतीचे छप्पराचे भाग अनेकवेळा कोसळले तरी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आले आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: दक्षिण जिल्हा इस्पितळ (Hospital) जरी कार्यान्वित झाल्यास वर्ष उलटले असले तरी जुन्या हॉस्पिसियोतील रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. प्रत्येक दिवशी शेकडो रुग्ण तपासणी, चिकित्सेसाठी येतात.काही वर्षापुर्वी हॉस्पिसियोतील 154 वर्षांचे बांधकाम तसेच ठेवुन नुतन इमारत बांधलेली असली व विस्तार झालेला असला तरी जुन्या इमारतीत काही विभाग चालु आहेत.

सर्व कर्मचारी सहकार्य करतात. यामुळे मोडकळीस आलेली जुन्या इमारतीतही बाह्यरुग्ण विभाग चालु आहेत असे हॉ्स्पिसियोची प्रमुख डॉ. आयरा आल्मेदा हिने पत्रकारांना सांगितले. मात्र ही जुनी इमारत मोडकळीस आली आहे. छप्पराचे भाग अनेकवेळा कोसळले तरी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आले आहे. रुग्णासह येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जिवाला धोका आहे. त्यासाठी ही जुने बांधकाम लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे.

सद्या हॉस्पिसियोत 250 खाटांची व्यवस्था आहे. जुन्या इमारतीवरील पत्र्याचे छप्पर कधी कोसळेल सांगता येत नाही. हे पत्रे अगदी निकामे झाले आहेत. शिवाय सभोवतालचे कुंपणही मोडलेले आहे. मागे जेव्हा वादळ झाले तेव्हा भिंती कोसळत होत्या. तर एका बाजुची भिंत जमीनदोस्त झालेली दिसते. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी सुद्धा या जुन्या इमारतीची दुर्दैशा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली होती. मात्र संबंघीत खात्याने अजुन दखल घेतली नसल्याने सर्वांनाच आश्र्चर्य होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT