Goa Health Minister महिला व बालकांना आरोग्य सुरक्षा कवच देणार

108 प्रकारच्या विविध पारंपारिक गोमंतकिय पोषक पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते
Goa Health Minister Vishwajit Rane
Goa Health Minister Vishwajit Rane Twitter/ @visrane
Published on
Updated on

पणजी: राज्यातील (Goa) महिला व मुलांच्या कल्याणासाठी महिला व बाल कल्याण खाते आणि आरोग्य खाते यांच्यात समन्वय राखून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. महिल व बाल कल्याच्या योजना घराघरात पोचवतानाच सर्वांना आरोग्य सुरक्षा कवच देण्यावर भर देण्यात येईल. असे प्रतिपादन महिला व बालकल्याण तसेच आरोग्य खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे (Goa Health Minister Vishwajit Rane) यांनी आज केले.

Goa Health Minister Vishwajit Rane
Goa Casino शेफच्या जीवावर बेतली मार्केटमधली बाचाबाची

ताळगाव येथे आज महिला व बाल कल्याण खात्याद्वारे आयोजित पोषण माह समारोप कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण खात्याचे सचिव डब्ल्यु राज शेखर, संचालक दिपाली नाईक, सहाय्यक संचालक संगीता परब, उपसंचालक ज्योती देसाई व इतर मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पोषण माह हा उपक्रम देशभर राबवण्यात येत असल्याचे सांगून केंद्रिय महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या सहकार्याने गोव्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी महिनाभर विविध उपक्रम राबवण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. राज्यात नव्या अंगणवाडी इमारती बांधण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगून राज्यातील ज्या सीडीपीओ तसेच अंगणवाडी सेविकांच्या गटांनी चांगले काम केले आहे त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे राणे यांनी यावेळी जाहिर केले. यावेळी मोठ्या प्रमाणात अंगनवाडी सेविका उपस्थित होत्या.

Goa Health Minister Vishwajit Rane
Goa Election: संजय राऊत आज गोव्यात, शिवसेना 22 जागा लढवणार

महिला व बाल कल्याण खात्याने वर्षभरात 30 हजारवर कार्यक्रम करुन 1 लाखावर लोकापर्यंत संपर्क साधल्याचे दिपाली नाईक यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. या कार्यक्रमापूर्वी पाटो पणजी येथून पोषण माहची जागृती करण्यासाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. विश्‍वजीत राणे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात केली.

108 गोमंतकीय पदार्थांचे प्रदर्शन

पोषण माह समारोप सोहळ्याच्या निमीत्ताने ताळगाव सभागृहात आज 108 प्रकारच्या विविध पारंपारिक गोमंतकिय पोषक पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मंत्री राणे यांच्यासह इतर मान्यवरांनी या पदार्थांची पाहणी केली व आश्‍वादही घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com