New Goa DGP Alok Kumar ANI
गोवा

Goa New DGP Alok Kumar: कोण आहेत गोव्याचे नवे पोलिस महासंचालक अलोक कुमार?

New Goa DGP Alok Kumar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात गोव्याचे महासंचालक जसपाल सिंग यांची भूमिका संशयित होती.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात गोव्याचे महासंचालक जसपाल सिंग यांची भूमिका संशयित होती. या प्रकरणात त्यांची लवकरच उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे, सिंग यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी देखील केली होती. या दिल्लीवारीनंतर त्यांची कोणत्याही क्षणी उचलबांगडी होणार हे नक्की होते.

आता तब्बल वीस दिवसांनंतर जसपाल सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता दिल्लीचे (Delhi) पोलिस आयुक्त अलोक कुमार यांची वर्णी लागली आहे. अलोक कुमार दिल्लीत सध्या कार्यरत आहेत. दिल्लीत त्यांनी आपल्या सेवेदरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. चला तर मग गोव्याचे नवे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांच्याबद्दल जाणून घेऊया...

Goa New DGP Alok Kumar

दरम्यान, अलोक कुमार AGMUT कॅडरचे 1996 बॅचचे IPS अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, जसपाल सिंग आणि अलोक कुमार एकाच बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआगोदर आलोक कुमार यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) महानिरिक्षक म्हणून काम केले आहे.

काही दिवसांपासूनच अलोक कुमार हे गोव्याचे नवे महासंचालक होणार अशी चर्चा होती. मात्र आज त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाला. तर जसपाल सिंग यांची आता दिल्लीला बदली करण्यात आली आहे. गोव्यात (Goa) आसगाव घर मोडतोड प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला घेरले होते. या प्रकरणात सिंग यांच्या भूमिकेवर विरोधकांनी सवाल उपस्थित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT