Naneli Waterfall Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfall : चौकशी अहवालानंतरच धबधबे खुले करण्‍यास परवानगी : वनमंत्री विश्‍‍वजीत राणे

काही धबधबे करणार कायमचे बंद; प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसाठी ‘दृष्टी’शी बोलणी

दैनिक गोमन्तक

वन खात्याच्या कार्यक्षेत्रात येणारे काही धबधबे हे पर्यटनासाठी धोकादायक आहेत. यासाठीच खात्याला त्‍याबाबतचा अहवाल बनवण्यास सांगण्यात आला आहे. कोणते धबधबे पर्यटनासाठी धोकादायक आहेत, कोणते धबधबे पर्यटनासाठी योग्य आहेत, याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक राजीव गुप्ता, मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार यांना अहवाल बनवण्यास सांगितले आहे.

तो अहवाल आल्यानंतर काही धबधबे पर्यटनासाठी खुले तर काही कायमचे बंद करण्यात येतील, असे वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सांगितले.

राज्यातील सत्तरी, काणकोण, सांगे तालुक्यांमध्ये अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान आणि वनखात्याच्या जमिनीवर हे धबधबे आहेत. या धबधब्यांवर काही शुल्क आकारले जाते. मात्र खात्याकडे यासाठी आवश्यक असलेला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. याकरताच आम्ही ‘दृष्टी’ या जीवरक्षकांच्या संघटनेशी बोलणी सुरू केली असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

सध्या हे सर्व धबधबे पर्यटनासाठी बंद आहेत. मात्र अशाही स्थितीत काहीजण धबधब्यांवर जात आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यापुढे या सर्व धबधब्यांवर दारूबंदी असेल, असे मंत्री राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

धबधब्यांवर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पाण्याची खोली माहीत नसते. म्हणून मद्य पिऊन पाण्यात उतरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सध्या पावसाळा सुरू असल्याने धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. प्रवाहाला गतीही आहे. साहजिकच धबधब्यांवर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे पाण्यात बुडून मरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यातील अनेक घटनांमधील तरुण मद्य पिऊन पाण्यात उतरतात. मद्य पिल्यानंतर त्यांना भान राहत नाही. परिणाम बुडून मरण्यात होतो, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

हिंटरलँड पर्यटनाला प्रोत्साहन : राणे

यंदा पाण्यात बुडून मरणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्‍याचा विपरित पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. वनमंत्री सध्या ‘हिंटरलँड वॉटर फॉल्स सर्किट’साठी आग्रही आहेत.

ते म्हणाले, सर्वच धबधब्यांचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दृष्टी-जीवरक्षक संस्थेसारखे प्रशिक्षित जीवरक्षक नेमण्यात येतील. सुरक्षेसाठीच्या सर्व उपाययोजना करून हिंटरलँड पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येईल. तोपर्यंत राज्यातील सर्व धबधबे पर्यटनासाठी बंद राहतील, असे राणे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मनोजनंतर अजयकडूनही सोशल मीडियाद्वारे 'बाण'; 'आरजी'त 'उजो'; कार्यकर्त्यांच्‍या ब्रेनवॉशचा आरोप

Goa Crime: गोवा हादरला! आधी पैशांचं आमिष, मग अत्याचार अन् मारहाण; 60 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

NEET Paper Leak: सीबीआयचा 'नीट' दणका; देशभर कारवाई; सहाजणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या

BITS Pilani Student Suicide: पुन्‍हा थांबली स्‍वप्‍ने! 'बिट्स पिलानी'च्‍या आणखी एका विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या, पोलिसांकडून तपास सुरू

Sugar Export Ban: मोदी सरकारचा मोठा निर्णय! सप्टेंबर 2026 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी; काय आहे नेमकं कारण?

SCROLL FOR NEXT