Bicholim Fraud Case : पर्यटन सफरीच्या नावाखाली फसवणूक; संशयित अटकेत

सव्वादोन लाखांना गंडा : डिचोली पोलिसांची ठाणे-महाराष्‍ट्र येथे कारवाई
Bicholim Police
Bicholim PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim : ‘टूर पॅकेज’च्या नावाखाली जवळपास सव्वादोन लाख रुपयांचा गंडा घालून पळ काढलेल्या ठाणे-महाराष्ट्रातील संशयित भामट्याच्या मुसक्या आवळण्‍यास डिचोली पोलिसांना यश आले. मोबाईल लोकेशनच्या आधारे माग काढीत पोलिसांनी संशयितास ठाणे येथे जेरबंद केले. त्‍याचे नाव यतीन श्रीराम कोचे असे आहे.

गेल्या सहा महिन्यापासून संशयित बेपत्ता होता. प्रत्येकवेळी तो ठिकाणे बदलत होता. उत्तरप्रदेश येथे पर्यटन सफर घडवून आणण्याचे आमिष दाखवून संशयित यतीन याने साखळीतील गुरुनाथ वामन नाईक आणि त्याच्या मित्रांकडून सव्वा दोन लाख रुपये उकळले होते. पैसे घेतल्यानंतर मात्र संशयित बेपत्ता होता.

मध्यंतरी संशयिताने जीवे मारण्याची धमकीही दिली होती, अशी तक्रार गुरुनाथ नाईक यांनी डिचोली पोलिस स्थानकात दिली होती.याप्रकरणी पोलिसांनी गेल्या १७ डिसेंबर रोजी भारतीय दंड संहितेच्‍या कलम ४२० आणि ५०७ कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. पोलिस संशयिताच्या मागावर होते.

Bicholim Police
Delta Corp Share : कॅसिनोंवर कर वाढला; शेअर्स गडगडले

पोलिसांनी अशा आवळल्‍या मुसक्‍या

संशयित यतीन हा ठाणे परिसरात असल्याची माहिती त्‍याच्‍या मोबाईल लोकेशनवरुन स्पष्ट झाल्यानंतर डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करून त्‍याच्‍या मुसक्या आवळल्या. कॉन्‍स्‍टेबल लक्ष्मण घाडी आणि लक्ष्मण नाईक यांनी ही कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लक्ष्मण घाडी पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com