Margao News : युवतीला वेश्‍‍याव्‍यवसायात ढकलणारा दलाल दोषी

आज ठोठावणार शिक्षा : नोकरी‍चे आमिष
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Margao : नोकरी देतो असे सांगून दिल्‍लीत रहाणाऱ्या एका बिहारच्‍या गरीब युवतीला गोव्‍यात आणून तिला वेश्‍‍याव्‍यवसायाला जुंपण्‍याचा आरोप असलेला दिल्‍लीतील दलाल अभिषेक मेहरा याच्‍यावरील गुन्‍हा मडगाव सत्र न्‍यायालयात सिद्ध झाला आहे.

दक्षिण गोवा अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर उद्या गुरुवार दि. १३ जुलै रोजी संशयिताची बाजू ऐकून घेतल्‍यानंतर त्‍याला शिक्षा ठोठावणार आहेत. अलीकडच्‍या काळात वेश्‍‍याव्‍यवसाय प्रकरणाशी निगडीत असलेल्‍या प्रकरणात झालेली ही दुसरी शिक्षा ठरणार आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ८ ऑक्‍टोबर २०२० या दिवशी सेर्नाभाटी-कोलवा येथे पोलिसांनी धाड घालून या युवतीची सुटका केली होती. अभिषेक मेहरा याने आपल्‍याला फसवून गोव्‍यात आणून वेश्‍‍याव्‍यवसाय करण्‍यास भाग पाडले अशी जबानी तिने दिली होती.

त्‍यानंतर कोलवाचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक मेल्‍सन कुलासो यांनी संशयिताला अटक करुन त्‍याच्‍याविरोधात न्‍यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आवश्‍‍यक ते पुरावे न्‍यायालयासमोर सादर केल्‍याने गुन्‍हा सिद्ध झाला.

Court
Goa Drowning Accidents : राज्यात दर तीन दिवसांमागे एकाचा बुडून मृत्यू

या प्रकरणी खटला सुरू असताना ही युवती पुन्‍हा आपल्‍या दिल्‍ली येथील घरी गेली. या युवतीच्‍या साक्षीविना संशयित दोषी होऊ शकला नसता. त्‍यामुळे ‘अर्ज’ संघटनेने दिल्‍लीतील आपल्‍या इतर संघटनांच्‍या साहाय्‍याने तिचे व तिच्‍या पालकांचे मन वळवून तिला गोव्‍यात साक्षीसाठी आणले. संशयिताने कशा प्रकारे आपल्‍याला या नरकात ओढले याचा पाढाच तिने न्‍यायालयात वाचला.

Court
Go First Airlines Crisis: आर्थिक दिवाळखोरीत असलेले 'गो फर्स्ट' पुन्हा विमानसेवा सुरु करण्याच्या तयारीत

अर्ज’ संघटनेची मोलाची कामगिरी

पीडित युवतीला साक्ष देण्‍यास तयार करण्‍याकरिता तसेच तिच्‍या पालकांचे मन वळविण्‍यासाठी ‘अर्ज’ या संघटनेने मोलाची कामगिरी निभावली. ‘अर्ज’चे अरुण पांडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मूळ बिहार येथील ही युवती दिल्‍लीत राहत होती.

तिच्‍या एका ओळखीच्‍या महिलेने मेहरा याच्‍याशी तिची गाठ घालून दिली. ‘आपल्‍या गोव्‍यात कित्‍येकांशी ओळखी आहेत असे सांगून तेथे तुला चांगली नोकरी देतो’ अशी लालूच दाखवून त्‍याने तिला गोव्‍यात आणले आणि वेश्‍‍याव्‍यवसायाला जुंपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com