House Dainik Gomantak
गोवा

Davorlim: दवर्ली येथील 'त्या' वादग्रस्त 165 घरांची कडक पोलीस बंदोबस्तात होणार पाहणी

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बेकायदेशीर घरांना क्रमांक देण्याच्या मुद्द्यावरून जो वाद निर्माण झाला आहे त्या वादग्रस्त अशा 165 घरांची उद्या 12 जानेवारी रोजी दवर्ली पंचायती कडून पाहणी ठेवण्यात आली आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दवर्लीचे सरपंच हर्क्यूलान नियासो यांनी ही माहिती दिली. ही घरे बेकायदेशीर असून शेत जमिनीसाठी राखीव असणाऱ्या जमीनीवर अतिक्रमण करून ती बांधण्यात आल्याची तक्रार जमीन मालक वेर्लेकर यांनी केली होती. त्या तक्रारीला अनुसरून ही पाहाणी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या घरांना क्रमांक देण्याच्या मुद्द्यावरून माजी उप मुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सरपंच नियासो यांच्यात वाद झाला होता. ही घरे जरी बेकायदेशीर असली तरी पंचायत कायद्यातील दुरुस्ती नुसार त्यांना क्रमांक देणे बंधनकारक असल्याचा दावा आजगावकर यांनी केला होता तर अजगावकर यांनी या घराची मालकी त्या लोकाकडे आहे याचा कागदोपत्री पुरावा सादर करावा आम्ही त्यांना घर क्रमांक देण्यास तयार आहोत अशी भूमिका नियासो यांनी घेतली होती.

या बेकायेशीर घरावर कारवाई करा आसा आदेश नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; अंतिम सामन्यात अभिषेक, हार्दिक आणि तिलक खेळणार नाही? कोचने दिलं अपडेट

Watch Video: 'मौलाना विसरले सत्तेत कोण आहे, असा धडा शिकवू की तुमची येणारी पिढी दंगा करणे विसरेल'; योगींचा इशारा

"जमाना ती आश्वासनां दिऊ नाकां,जाता तेंच उलय" मंत्री कामतांच्या 'त्या' आश्वासनावर पोळजींचा टोला Watch Video

दोडामार्ग घटनेमागे मंत्री राणे सूत्रधार, त्यांना अटक करा; सिंधुदुर्गात हिंदू–मुस्लिम तणाव वाढविण्यास तेच जबाबदार - मविआ

Goa Police: जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 'NSA' कायदा लागू करण्याचा अधिकार द्या, गोवा पोलिसांचा राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

SCROLL FOR NEXT