CM Pramod Sawant and Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांकडून गोविंद गावडेंचा बचाव

दैनिक गोमन्तक

Goa CM Pramod Sawant: सभापती रमेश तवडकर यांनी केलेल्या आरोपांवरून विधानसभेत चर्चा होण्यापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गोविंद गावडे यांना संरक्षण दिले. मात्र, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर भरमसाट पैसे खर्च केल्याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी बुधवारी (ता.७) विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला करून गावडे यांना कोंडीत पकडले.

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च २०१४पासूनचा आहे. आपण या खात्याचा ताबा घेतल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर केवळ ४८ कोटी रुपये खर्च केले आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासाहून अधिक काळ या एकाच प्रश्नावर विधानसभेत चर्चा झाली.

या प्रश्नावरील चर्चेची सुरवात व्हिएगस यांनी उत्तर उशिरा मिळाल्याने आपला हक्कभंग झाल्याच्या आरोपाने केली. ते म्हणाले, मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजल्यानंतर ते केले गेले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी सल्लागार केवळ ४५ दिवसांसाठी नेमला आणि त्याला कोट्यवधी रुपये दिले.

एवढ्या छोट्या कालावधीत त्यांनी काय भव्य दिव्य केले, याचे उत्तर मिळाले पाहिजे. जाहिरातबाजीवर 23 कोटी रुपये व स्मृतिचिन्हे आणि स्मरणिकेसाठी दोन-दोन कंपन्यांना कंत्राट कशासाठी दिले, या साऱ्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे.

आलेमाव म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर मंत्री आपण खर्च केला नाही असे जर सांगत असतील तर त्यांच्या पूर्वसुरीने घोटाळा केला, असे त्यांना सुचवायचे आहे का? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठीचे प्रशिक्षण ऐनवेळी शेवटच्या क्षणी का दिले गेले.

दहा कोटी रुपयांच्या कामाला कार्योत्तर मंजुरी का घेतली. नेहरू स्टेडियमच्या केवळ साफसफाईवर एक कोटी साठ लाख रुपयांचा खर्च का केला गेला. या साऱ्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी झालीच पाहिजे.

या प्रश्नांना उत्तर देताना क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले, प्रश्नाला शुक्रवारीच उत्तर दिले होते. मंगळवारी केवळ त्यात दुरुस्ती केली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी निविदा काढण्यापूर्वी सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती. स्पर्धेच्या आयोजनासाठी पूर्वीपासूनच कर्मचारी नेमले होते. प्रत्यक्षात 221 कर्मचाऱ्यांऐवजी 47 कर्मचारी नेमण्यात आले होते.

573 कोटी रुपये हा खर्च 2014 पासूनचा आहे. त्यात लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचाही खर्च समाविष्ट आहे. स्पर्धेच्या आयोजनावर 445 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी 261 कोटी रुपये अदा केले आहेत, तर अद्याप 174 कोटी रुपयांचे सरकार देणे आहे.

क्रीडा व्यवस्थेत गोव्यातल्या 200 टॅक्सी वापरल्या गेल्या होत्या. या निविदेत गोमंतकीय कंपन्या सहभागी झाल्या नाहीत, त्यामुळे ते कंत्राट इतर कंपन्यांना द्यावे लागले. 10 हजार खेळाडू, 6 हजार तांत्रिक कर्मचारी व इतर अशा हजारो जणांना खानपान सेवा पुरवणे हे स्वयंसेवी गटांच्या आवाक्याबाहेरील काम होते म्हणून त्यांना कंत्राट दिले नाही.
- गोविंद गावडे, क्रीडामंत्री
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी एकूण खर्च केलेल्या ९७५ कोटी रुपयांपैकी ३४९ कोटी रुपये हे केवळ आयोजनावर खर्च केले आहेत. ज्यात उद्‌घाटन आणि समारोप सत्राचाही समावेश आहे. त्याच्यावरच २३ कोटी रुपये खर्च केले आहेत. क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भातील अंदाजपत्रकातील आकडेवारी, एकंदर खर्चाची आकडेवारी आणि बिले अदा केलेल्याची आकडेवारी यात मोठा फरक आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT