Goa News: ‘भावकई’ची निवडणूक रद्द

Goa News: दोन सदस्यच उपस्थित: दुसऱ्यांदा बैठकीकडे शेतकऱ्यांची पाठ
Goa Election
Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: मयेतील भावकई खाजन कूळ संघटनेची कार्यकारी समिती निवडण्यावरून निर्माण झालेला गुंता अद्याप सुटलेला नाही. सभासद शेतकऱ्यांच्या अनास्थेमुळे सलग दुसऱ्यांदा निवडणूक रद्द करण्याची पाळी आली आहे.

कार्यकारी समिती निवडण्यासाठी आज (बुधवारी) दुसऱ्यांदा बोलाविलेल्या बैठकीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने निवडणूक घेण्यात अडचण निर्माण झाली. बैठकीची वेळ टळून गेली, तरी केवळ दोनच सभासद शेतकरी उपस्थित होते. त्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही. आजच्या बैठकीसाठी डिचोली मामलेदार कार्यालयातील अव्वल कारकून दत्तात्रय परब हे निर्वाचन अधिकारी म्हणून हजर होते. आजच्या बैठकीचा अहवाल मामलेदारांना सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मयेतील भावकई खाजन कुळ संघटनेच्या विद्यमान कार्यकारी समितीची मुदत संपत आली आहे. त्यामुळे नवीन कार्यकारी समिती निवडण्यासाठी गेल्या 31 जानेवारी रोजी मये पंचायत सभागृहात शेतकऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती.

Goa Election
Goa Accident Death: स्मार्ट सिटी पणजीत बळी मळा-गटारात पडून वृद्ध मृत्‍युमुखी

मात्र त्या बैठकीत आवश्यक गणपूर्ती झाली नसल्याने निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुढे ढकलण्याची पाळी निर्वाचन अधिकाऱ्यांवर आली होती. त्या बैठकीवेळी पाच सभासदांसह शेतकरी मिळून जेमतेम दहाजण उपस्थित होते. निवडणूक घेण्यासाठी आज पुन्हा बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीकडे तर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

गेल्या आठवड्यात (ता.३१ जानेवारी) झालेल्या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांच्या एका गटाने निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या सभासद यादीला आक्षेप घेतला होता. इच्छुक शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे.

Goa Election
Minister Govind Gaude: ‘त्या’ ध्वनिफितीतील आवाज आपलाच; रेडकर यांची कबुली

अशी मागणी शेतकऱ्यांनी आहे. नवीन सभासद नोंदणी करून नंतरच निवडणूक घ्या, अशी मागणीही शेतकऱ्यांच्या गटाकडून करण्यात आली होती. मात्र आजच्या बैठकीला शेतकरीच अनुपस्थित राहिल्याने निवडणुकीवरून निर्माण झालेला गुंता वाढला आहे.

सरकारने हस्तक्षेप करावा

स्थानिक आमदारांसह प्रशासकीय यंत्रणेने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे. खाजन शेती वाचविण्यासाठी बांध आदी उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीवरून निर्माण झालेला गुंता सोडवून कार्यकारी समिती निवडावी, अशी मागणी अमर गावकर आणि अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com