Goa BJP|Pramod Sawant|Sadanand Tanavade  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजप सदस्यता मोहीमेमध्ये ३१ हजारांहून अधिक मिस कॉल; सर्वधर्मीयांना सदस्य होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Pramod Sawant: भाजप सदस्यता मोहिम ही राज्यात २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजप सदस्यता मोहिम ही राज्यात २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. पुन्हा भाजपचे सरकार राज्यात आणण्यासाठी त्याची मदत होणार आहे. भाजप ‘सबका साथ, सबका विकास’ तत्त्वावर कार्य करणारा पक्ष असल्याने सर्व धर्म, जाती व पंथाच्या नागरिकांनी सदस्य व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ते भाजप कार्यालयात सदस्यता मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री बाबूश मोन्सेरात, भाजपचे प्रदेश सरचिटणीस नरेश सावईकर व सर्वानंद भगत उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, भाजप देश प्रथम तत्त्वावर काम करणारा पक्ष आहे, त्यामुळे ज्यांना देशसेवा करायची आहे त्यांनी भाजपचे सदस्यत्त्व स्वीकारावे. गेल्या ६० वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा मागील दहा वर्षांत झाला आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेल्या भष्ट्राचाराबाबत युवकांनी माहिती करून घेतली पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

३१ हजारहून अधिक लोकांचे मिसकॉल

भाजप हा लोकशाही तत्त्वावर चालणारा पक्ष असल्याने दर सहा वर्षांनी सदस्यता मोहीम राबविण्यात येते. ही भाजपच्या निवडणूक प्रक्रियेचाही एक भाग आहे. राज्यात सदस्यता मोहीम सुरू झाल्यापासून ३१ हजारांहून अधिकांनी मिस कॉल दिला असून ९ हजार जणांनी सदस्यत्व प्रक्रिया पूर्ण केली असून इतरांची पूर्ण होणार आहे. राज्यात सदस्यता मोहिमेच्या यशस्वीत्साठी कार्यशाळा राबवली, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 8 July 2026: बुधवारचा दिवस ठरणार खास; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस, तर 'या' राशींना धोक्याचा इशारा! जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

SCROLL FOR NEXT