Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Mission Rabies Goa: शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असतानाच, या कुत्र्यांना एका विचित्र ''व्हायरस''ची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Mission Rabies Goa
Stray Dogs VirusDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असतानाच, या कुत्र्यांना एका विचित्र ''व्हायरस''ची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात काही कुत्री अशक्त होऊन मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे कुत्र्यांना ''व्हायरस''ची लागण झाल्याच्या संशयाला बळ मिळत आहे. ''मिशन रॅबीज'' या स्वयंसेवी संस्थेकडून (एनजीओ)ही तशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरातील शांतारामनगर परिसरात या संशयित ''व्हायरस''चा प्रादुर्भाव अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

Mission Rabies Goa
Ebola Virus Case: राजस्थानमध्ये आढळला इबोलाचा पहिला संशयित रुग्ण; युगांडाच्या महिला पर्यटकामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

गेल्या महिनाभरात या भागातील तीन भटकी कुत्री अचानक मृत्यूमुखी पडली आहेत. तर काही कुत्री अशक्त अवस्थेत भटकताना दिसून येत आहेत. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शांतारामनगर येथील रहिवासी विश्वास गावस आणि विनोद पळ यांनी केली आहे.

शहरात सध्या सर्वत्र भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, एक हजारांहून अधिक भटकी कुत्री असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळपाकळपाने ही कुत्री शहरात दिवसरात्र फिरत असतात. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे अधूनमधून अपघातही घडतात. रात्रीच्या वेळी ही कुत्री मोठ्याने भुंकत असल्याने नागरिकांची झोपमोड होत असते. शहरातील भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com