Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Former Afghanistan fast bowler Shapoor Zadran passed away: अफगाणिस्तान क्रिकेटसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. संघाचे माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान यांचे सोमवारी (7 जुलै) निधन झाले.
Former Afghanistan fast bowler Shapoor Zadran passed away
Former Afghanistan fast bowler Shapoor Zadran passed awayDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान क्रिकेटसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. संघाचे माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान यांचे सोमवारी (7 जुलै) निधन झाले. ते अवघ्या 38 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते एका दुर्मीळ आणि गंभीर आजाराशी झुंज देत होते. उपचारासाठी त्यांना भारतात आणण्यात आले होते आणि दिल्लीतील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक

शापूर जदरान यांच्या निधनाची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे दिली. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशात जदरान यांचे अफगाणिस्तान क्रिकेटमधील योगदान विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. देशात क्रिकेटचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने आणि खेळावरील निष्ठेने अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा दिली, असे बोर्डाने नमूद केले.

Former Afghanistan fast bowler Shapoor Zadran passed away
Goa Mining: अठरापैकी सहा खाण लीज सुरू; सरकारला प्राथमिक टप्‍प्‍यात मिळाले सुमारे 400 कोटी

दुर्मीळ आजाराशी अनेक महिने झुंज

मिळालेल्या माहितीनुसार, शापूर जदरान हे 'हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस' (HLH) या दुर्मीळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. सुरुवातीला अफगाणिस्तानमध्ये उपचार करण्यात आले, मात्र अधिक प्रगत वैद्यकीय सुविधांसाठी त्यांना भारतात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच अफगाणिस्तानचे स्टार क्रिकेटपटू रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.

भारताविरुद्धच्या कामगिरीमुळे मिळाली विशेष ओळख

शापूर जदरान यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय सामने खेळले. विशेषतः 2012 च्या टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध त्यांनी प्रभावी गोलंदाजी करत सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांना बाद केले होते. त्या सामन्यात त्यांच्या अचूक आणि आक्रमक गोलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या कामगिरीमुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष चर्चेत आले.

अफगाणिस्तानसाठी मोलाची कामगिरी

शापूर जदरान हे अफगाणिस्तानच्या सुरुवातीच्या यशस्वी क्रिकेट प्रवासातील महत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी देशासाठी 44 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 43, तर टी-20 मध्ये 37 बळी घेत संघाच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या वेगवान गोलंदाजीमुळे ते प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी कायमच आव्हान ठरत असत.

Former Afghanistan fast bowler Shapoor Zadran passed away
Goa Cooperative Bank: 21 वर्षांनंतर मोठा निकाल! 40 लाखांच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सर्व 7 आरोपी निर्दोष; पोलिसांच्या ढिसाळ तपासावर न्यायालयाचे ताशेरे

क्रिकेटविश्वातून श्रद्धांजली

शापूर जदरान यांच्या निधनानंतर अफगाणिस्तानसह जागतिक क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक विद्यमान आणि माजी क्रिकेटपटूंनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेटच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या या वेगवान गोलंदाजाच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वाने एक समर्पित आणि प्रेरणादायी खेळाडू गमावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com