Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

Girl Mistakes Water Bottle For Car Gear: व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका कारच्या आतून रेकॉर्ड करण्यात आला, यामध्ये एक तरुणी अतिशय आत्मविश्वासाने कार चालवताना दिसत आहे.
Girl Mistakes Water Bottle For Car Gear
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Girl Mistakes Water Bottle For Car Gear: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. लोक आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठी गोष्ट, मग ती नवीन गाडी खरेदी असो, फिरणे असो किंवा लग्न असो, फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करत असतात. जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुम्हाला दररोज अनेक मजेदार आणि अतरंगी व्हिडिओ पाहायला मिळत असतील. सध्या अशाच एका तरुणीच्या ड्रायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून नेटीझन्स हसून हसून लोटपोट झाले आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका कारच्या आतून रेकॉर्ड करण्यात आला, यामध्ये एक तरुणी अतिशय आत्मविश्वासाने कार चालवताना दिसत आहे. कार चालवताना अनेकदा गियर बदलावा लागतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. व्हिडिओमधील तरुणी देखील कारचा गियर बदलण्याचा प्रयत्न करते, मात्र गडबडीत किंवा लक्ष नसल्यामुळे तिचा हात गियरवर जाण्याऐवजी तिथेच शेजारी ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीवर पडतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या तरुणीला पाण्याच्या बाटलीमध्ये आणि कारच्या (Car) गियरमध्ये असलेला फरकच समजत नाही. ती त्या बाटलीलाच कारचा गियर समजून अनेकदा पुढे-मागे हलवताना आणि गियर बदलण्याचा प्रयत्न करताना दिसते. तरुणीच्या याच अजब चुकीमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

हा मजेशीर व्हिडिओ 'X' वर @iarunchaudhary नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये मजेशीर अंदाजात लिहिले की, 'दीदीची ड्रायव्हिंग स्टाईल पाहून चांगल्या चांगल्यांना घाम फुटेल.' हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून यावर नेटीझन्स मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका युझरने लिहिले की, 'असे वाटते की ही तरुणी ब्रेकअप करुन आली, म्हणूनच तिला गियर आणि बाटलीतला फरक कळत नाहीये.' दुसऱ्या एका युझरने लिहिले की, 'याला नकली गियर म्हणू शकतो भाऊ', तर तिसऱ्या युझरने चिडून 'तिथे बाटली कोणी ठेवली?' असा प्रश्न विचारला. एकूणच या दीदीच्या ड्रायव्हिंगने इंटरनेटवर सर्वांचे भरपूर मनोरंजन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com