Sonali Phogat Case Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat हत्या ते CBI चौकशी; आत्तापर्यंत काय घडलं?

अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येला एक महिना पूर्ण होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

टिक-टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला. सुरूवातीला ह्रदयविकाराच्या झटक्याने फोगाट यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला. तोच सूर इतर सर्वांनी ओढला. पण, फोगाट कुटुंबियांनी केलेले आरोप आणि वाढता दबाव लक्षात घेता गोवा पोलिसांनी (Goa Police) गुन्हा दाखल केला. सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी याप्रकरणी हणजूण पोलिस (Anjuna Police Station) ठाण्यात तक्रार दिली. दाखल तक्रारीवरून सोनाली फोगाट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि स्टाफ मधील सहकारी सुखविंदर पाल सिंग (Sukhwinder Singh & Sudhir Sangwan) यांना 25 ऑगस्ट रोजी गोवा पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी अटक सांगवान आणि सिंग यांची चौकशी केली असता, दोघांनी हत्येची कबुली दिली. सोनाली फोगाट यांची संपत्ती हडपणे तसेच, त्यांची राजकीय कारर्कीत संपविण्याचे उद्देशाने दोघांनी संगणमताने फोगाट यांची हत्या केली असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर हणजूण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 302 हे खूनाचे कलम वाढविण्यात आले. देशात खळबळ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येला आता एक महिना पूर्ण होत आहे.

अंमली पदार्थ आणि कर्लिस वादाच्या भोवऱ्यात

सोनाली फोगाट यांना मृत्यूपूर्वी कर्लिस रेस्टॉरंटमध्ये (Curlie's Night Club) संशयास्पद पेय जबरदस्ती पाजले जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. तसेच, सोनाली यांचे कर्लिसमधील पार्टीचे इतर व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले. सोनाली फोगाट यांना मेथापेथामाईन हा अंमली पदार्थ दिल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. तोच अंमली पदार्थ गोवा पोलिसांना तपासादरम्यान कर्लिसच्या स्वच्छतागृहात आढळून आला. त्यामुळे सोनाली फोगाट प्रकरणात कर्लिस आणि अंमली पदार्थ हे महत्वाचे दोन धागे समोर आले.

त्यावरून गोवा पोलिसांनी कर्लिसचा मालक एडविन नुनिस यालाही अटक केली होती. याशिवाय ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर आणि रामदास मांद्रेकार यांना देखील अंमली पदार्थ प्रकरणात अटक केली.

वादग्रस कर्लिस सील ते जमीनदोस्त करण्याचे आदेश

वादग्रस कर्लिस 30 ऑगस्ट रोजी सील करण्याचे न्यायालयाने दिले. त्यानंतर 08 ऑगस्ट रोजी हणजूण येथील वादग्रस कर्लिस नाईट क्लब (Curlie's Night Club) पाडण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) कायम ठेवला. आणि त्यानंतर नुनिसच्या पर्सनल कॉटेजसह कर्लिसाचा काही भाग पाडण्यात आला.

तपासासाठी गोवा पोलिस हिस्सार, हरियाणात दाखल

प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गोवा पोलिस (Goa Police) हरियाणातील हिस्सार (Hissar, Haryana) या सोनाली फोगाट यांच्या मुळगावी गेले. गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट यांचे घर, फार्महाऊस याची झाडाझडती घेतली. येथून पोलिसांनी सोनाली फोगाट यांच्या व्यक्तिगत डायऱ्या देखील तपासासाठी सोबत घेतल्या. याशिवाय सोनाली फोगाट यांच्या बँक खात्याची माहिती गोळा केली.

एडविन नुनिस, दत्तप्रसाद गावकर, रामदास माद्रेकार यांना सशर्त जामीन

कर्लिस बीच शाकचा मालक एडविन नुनिस याला सुरूवातीला पाच दिवसांचा पोलिस रिमांड आणि नंतर काही दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्यानंतर 07 सप्टेंबर रोजी त्याला म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. नुनिसला तीस हजार मुचलक्यावर जामीन देत कर्लिस परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला.

तसेच, ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर आणि रामदास मांद्रेकार यांना देखील 19 सप्टेंबर रोजी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

15 सप्टेंबर 2022: गृहमंत्रालयाकडून तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश

गोवा पोलिसांकडून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी फोगाट कुटुंबियांनी सुरूवातीपासून करत होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी त्यासाठी तयारी दर्शवली. केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबत कळविण्यात आले. 15 सप्टेंबर 2022 रोजी गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी सोनाली फोगाट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले.

16 सप्टेंबर 2022: मुंबईतील सीबीआय पथक तपासासाठी गोव्यात दाखल

सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आल्यानंतर, 16 सप्टेंबर रोजी मुंबईतील सीबीआय पथक तपासासाठी गोव्यात दाखल झाले. सीबीआय अधिकारी रेचपाल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास होणार आहे. पथकाने हणजूण पोलिसांकडून या प्रकरणाचे सर्व दस्तावेज ताब्यात घेतले व नव्याने तक्रार दाखल केली.

सीबीआय तपासाला सुरूवात

सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी सध्या सीबीआय आणि फॉरेन्सिक टिमने गोव्यात तळ ठोकला आहे. पथकाने या प्रकरणातील केस पेपर्स, पोलिस डायरी, साक्षीदार आणि आरोपींचे स्टेटमेंट असे 500 पानांचे दस्तऐवज हाती घेतले आहेत. यासह सीसीटीव्ही फुटेज, फोगाट यांच्या वैयक्तिक डायरीज् आणि इचर साहित्य तपासाठी ताब्यात घेतले आहे.

सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी सीबीआय पथकाने 18 सप्टेंबर (रविवारी) फॉरेन्सिक तज्ज्ञ अधिकाऱ्यांसह हणजूण येथील कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटला भेट दिली. तेथे सोनाली बेशुद्धावस्थेत होत्या, त्या जागेची कसून पाहणी केली. ‘कर्लिसॅचा चालक एडविन नुनिस व काही कर्मचाऱ्यांची चौकशी करत जबानी नोंदवल्या. यानंतर पथकाने द ग्रँड लिओनी रिसॉर्टवर जाऊन उपलब्ध माहितीच्या आधारे तपास केला.

सूत्रधार मोकाटच!

गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट प्रकरण आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतले नाही असा आरोप सर्वच स्तरातून झाला. फोगाट कुटुंबियांनी घेतलेल्या अटळ भूमिकेमुळे गोवा पोलिसांच्या तपासाला गती आली आणि या घटनेतील एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर आले. गोवा पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संशयितांना अटक करून चौकशी केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तरीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी पुढे आली असली तरी हेतू अजून अस्पष्ट आहे. सीबीआयकडे तपास सोपविल्यानंतर या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येतील अशी आशा आहे. गोव्यासह संपूर्ण देशात सोनाली फोगाट हत्या प्रकरण गाजत आहे. राजकारण आणि मायानगरी अशा दोन्ही बाजू असलेल्या या हाय प्रोफाईल प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By - Pramod Yadav

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT