Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: आलेक्स रॉनी डिसोझा गजाआड

Goa Crime News: खुनी हल्ला प्रकरण: सांतिनेज येथून अटक, 9 गुन्हे नोंद

दैनिक गोमन्तक

Goa Crime News:

तीन महिन्यांपूर्वी टोंक-करंझाळे येथे फर्न बारजवळ रात्रीच्यावेळी सराईत गुन्हेगार सूर्यकांत ऊर्फ सूर्या कांबळी (55) याच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरारी मुख्य सूत्रधार आलेक्स रॉनी डिसोझा (27) याला तांबडीमाती-सांतिनेज येथील त्याच्या घरातून पोलिसांनी शिताफीने अटक केली.

हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली सुरी पोलिसांनी जप्त केल्याने न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला संशयित आलेक्स रॉनी डिसोझा याच्याविरुद्ध पणजी पोलिसांत 9 गुन्हे नोंद आहेत. त्यातील काहींमध्ये आरोपपत्र दाखल झाले असून काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

सूर्या कांबळी व आलेक्स रॉनी डिसोझा यांच्यात असलेल्या पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला होता. दोघा अज्ञातांनी सूर्या याच्या चेहऱ्यावर सुरीने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले होते.

दोन्ही हल्लेखोर हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत आलेक्स रॉनी डिसोझा याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याची माहिती त्या अल्पवयीन गुन्हेगारांनी उघड केली होती. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली सुरी संशयित आलेक्स रॉनी डिसोझा यानेच दिली होती व ती हल्ल्यानंतर परत करण्यात आल्याचे जबानीत त्यांनी पोलिसांना सांगितले होते.

पोलिसांनी तांबडी माती-सांतिनेज येथील जे.पी. बारच्या मागे राहत असलेल्या आलेक्स रॉनी डिसोझा याचा अनेकदा शोध घेतला. मात्र, तो सापडतच नव्हता. या दरम्यानच्या काळात त्याने सत्रन्यायालयात तसेच उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते.

संशयित डिसोझा हा सराईत गुन्हेगार असल्याने तसेच अल्पवयीन गुन्हेगारांमार्फत असे गुन्हे केल्यास त्यांना शिक्षा होऊ शकत नाही, ही मोडस ऑपरेंडी त्याला माहीत अससल्याने त्याला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

पोलिसांकडून नियोजनपूर्वक कारवाई

1 गेल्या काही दिवसांपासून पणजी पोलिसांनी संशयित आलेक्स रॉनी डिसोझा राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचला होता तसेच पाळत ठेवली होती. तो अधूनमधून घरी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

2 डिसोझा रात्रीच्यावेळी घरी परतणार असल्याची माहिती मिळाल्यावर तो घरी पोहचण्याआधीच त्याला गजाआड करण्यात आले. त्याने लपवून ठेवलेली सुरी पोलिसांनी त्याच्या उपस्थितीत जप्त केली व जबानीही पूर्ण केली. त्यामुळे न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT