Alex Reginald : मी ज्यावेळी काँग्रेस पक्षात होतो त्यावेळी हेच नेते माझ्यावर मी भाजपच्या जवळ आहे. मी पक्षविरोधी कारवाया करतो असा आरोप करत होते. आज तेच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ही गोष्ट म्हणजे काँग्रेस नेतृत्वाच्या श्रीमुखात ठेवून दिलेली सणसणीत चपराक नव्हे का असा सवाल कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष नालायक नेत्यांच्या हातात आहे, हे मी पक्ष नेतृत्वाला वारंवार सांगितले. पण त्यावेळी माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नाही. उलट या अशा नेत्यांसाठी मला काँगेस सोडावी लागली. मी दोन वर्षे विरोधी पक्षात होतो. मी सरकार विरोधात कित्येक मुद्दे घेऊन आवाज उठविला पण त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाने मला पाठिंबाही दिला नाही आणि कौतुकही केले नाही. आता काँग्रेस त्याचीच फळे भोगत आहे, असा निशाणाही त्यांनी साधला.
आजच्या या फुटीबद्दल त्यांना विचारले असता रेजिनाल्ड म्हणाले, भाजप पक्षात आज आठ आमदार सामील झाले. उद्या आणखीनही आमदार सामील होऊ शकतात. मी अपक्ष आमदार आहे. मला त्याचा काही फरक पडत नाही. मी माझ्या मतदारांशी बांधील आहे. मात्र ज्या मतदारसंघांतून आमदार फुटले आहेत तिथले मतदार काय म्हणतात ते पाहावे लागेल, असे ते म्हणाले
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.