CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections: ''भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली तर मतदार त्यांना पाडतील'', मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

CM Pramod Sawant: आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी अपक्ष म्हणूनच लढवावी. आपण त्यांना भाजपच्या तिकिटावर लढायला असे सांगणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: २०२७ ची निवडणूक कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी अपक्ष म्हणूनच लढवावी. आपण त्यांना भाजपच्या तिकिटावर लढायला असे सांगणार नाही, कारण येथील मतदार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतात म्हणून त्यांना पाडतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कुडतरीत ८० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची व्हर्च्युअल पद्धतीने पायाभरणी केल्यावर ते बोलत होते. रेजिनाल्ड कॉंग्रेसमध्ये असताना कुडतरीचा विकास झाला नाही. पण अपक्ष निवडून आल्यावर भाजपच्या (BJP) पाठिंब्याने त्यांनी दहा विकास कामांचा शुभारंभ केला. एका अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्र्यासह चारमंत्री व जास्तीत जास्त आमदार एकत्र येणे, हा दुर्मीळ योगायोग असेच म्हणावे लागेल. आम्ही सर्व जण रेजिनाल्डच्या प्रेमापोटी येथे आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या सोहळ्याला जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, क्रीडामंत्री गोविंद गावडे, आंतोन व्हाज, नीलेश काब्राल, संकल्प आमोणकर, डॉ चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट हे आमदार, आलोक कुमार, विविध खात्यांचे अधिकारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT