Alexo Reginaldo Lorenko

 

Dainik Gomantak 

गोवा

अलेक्सो रेजिनाल्डो यांनी पक्षप्रवेशानंतर ममता बॅनर्जींची घेतली भेट !

कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को (Alexo Reginaldo Lorenko) यांनी तृणमुल पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यात गोवा राज्याचाही समावेश आहे. सत्तेमध्ये परतण्यासाठी भाजप गोव्यात आपली पूर्ण ताकद लावत आहे. तर दुसरीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसह तृणमुल कॉंग्रेस पक्षाने (Trinamool Congress) स्थानिक पक्षांबरोबर युती करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर (goa forward party) युती करत आपली ताकद वाढविण्यासाठी तयारी सुरु केली. मात्र कॉंग्रेसमधील विद्यमान आमदार तृणमुल कॉंग्रेससह भाजपमध्ये सामील होऊ लागले आहेत. यातच कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को (Alexo Reginaldo Lorenko) यांनी तृणमुल पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली आहे.

दरम्यान तृणमुल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (mamata banerjee) आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (abhishek banerjee) यांच्या उपस्थितीत आज तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. माजी कॉंग्रेस आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होतो असे त्यांनी यावेळी म्हटले. अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को, ज्यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला, ते गोव्यातील कुर्तोरिम येथील विद्यमान आमदार आहेत.

शिवाय, अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी तृणमुल पक्षात सामील झाल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर म.गो. पक्षाचे प्रमुख सुधिन ढवळीकरही (Sudin Dhavalikar) उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT