Mla Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Aldona News: हळदोणा मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर; फरेरा यांची माहिती

या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या असून लवकरच त्या उघडून काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती आमदार ॲड. कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

हळदोणा मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून लवकरच त्या उघडून काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती आमदार ॲड. कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी दिली.

हळदोणा मतदारसंघातील कामरखाजन- आकय एनएच ६६ या रस्त्याच्या हॉटमिक्सिंगच्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

राज्य महामार्गाला स्पर्श करणाऱ्या आकय वन तपासनाक्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील कामरखाजन सर्व्हिस रोडच्या सुरुवातीच्या प्रवेश स्थळापर्यंत १ कोटी ४९ लाख रुपये खर्चून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे.

रस्त्याची दुरवस्था झाली होती. असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. हा रस्ता खोदून नंतर भरण्यात आला, मात्र पावसाळ्यात खड्डे निर्माण होण्याची शक्यता होती.

डांबरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदारांनी आभार मानले.

१ कोटी ४९ लाख रुपयांची ही निविदा मंजूर करून घेण्यात आम्हाला यश आल्याचा आनंद आहे. आमच्या प्रकल्पांचे प्रस्ताव जलदगतीने मंजूर झाले याचा मला आनंद आहे. हे लोकांच्या हिताचे आहे, म्हणून आम्ही लवकरच काम सुरू करीत आहोत. कोट्यवधी रुपयांचे अनेक प्रकल्प सुरू असून त्यांना मंजुरी मिळाली असून निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत मी या प्रकल्पांची घोषणा करणार आहे. जनतेसाठी वेगाने काम करणाऱ्या सरकारचा फायदा केवळ आमच्या मतदारसंघालाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जनतेला होईल, याचा मला आनंद आहे.

"मला आनंद आहे की आम्ही शक्य तितकी अपेक्षापूर्ती करू शकतो. मला आशा आहे की आपण कामाचा हा वेग कायम ठेवू शकू.

मी सर्वांना आवाहन करतो की, विशेषत: मतदारसंघातील काही त्रुटी असतील तर आमच्या निदर्शनास आणून द्या. आम्ही प्राधान्याने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे फरेरा यांनी सांगितले.

हा रस्ता मलनिस्सारणाचे जाळे आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आला होता आणि त्यामुळे तो जीर्ण अवस्थेत होता आणि गेल्या १० वर्षांपासून काहीच केले गेले नाही आणि हे काम मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार फरेरा यांचे स्थानिक रहिवासी जेरोनिमो पिन्हो यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT