मद्यपान जागृती कार्यक्रम (South Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: ... या कारणामुळे दक्षिण गोव्यात चालू आहे मद्यपान जागृती

मद्यपान जागृती कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद (Alcohol Awareness in Goa)

मंगेश बोरकर

Alcohol Awareness: गोवा (Goa) पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे गोव्यात इतर दारू पिण्यासाठी येणाऱ्या पर्यटनाची संख्या कमी नाहीये, कारण देशात सर्वात स्वस्त दारू ही गोव्यात मिळते. परंतु गोव्यात मद्यपानामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन काही संस्था मद्यपानाविषयी जागृती करण्यासाठी पुढे येत आहेत.

आल्कोहोलिक्स एनोनिमस इंटर ग्रुपने दक्षिण गोव्यातील आपल्या कंपनीचे सुरक्षा कर्मचारी, हाउसकिपिंग व एमटीएस कर्मचाऱ्यांसाठी मद्यपान जागृती कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम गोवा मनुष्य संसाधन विकास महामंडळाच्या विनंतीनुसार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला 400 पेक्षा कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

मद्यपानाचे वाईट परिणाम व मद्यपानाची व्यसन जडलेल्यांना त्यांतुन मुक्त कसे करावे, या बद्दलचे मार्गदर्शन या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले.हा कार्यक्रम आयोजित करण्यास महामंडळाचे ज्येष्ठ सुरक्षा अधिकारी इचित फळदेसाई यानी चांगले संयोजन केले. हा कार्यक्रम 28 ऑगस्ट रोजी केपे येथील सरकारी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT