Akhada Water Supply Dainik Gomantak
गोवा

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

Akhada Water Supply: सांतईस्तेव्ह पंचायत क्षेत्रातील आखाडा बेटावर गणेश चतुर्थीपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

खांडोळा: सांतईस्तेव्ह पंचायत क्षेत्रातील आखाडा बेटावर गणेश चतुर्थीपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऐन चतुर्थीच्या काळात विशेषतः महिलांची पाण्यासाठी धावपळ झाली. सण संपल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आखाडा बेटावर चार विहिरी असून, सध्या त्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना पूर्णपणे नळाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पूर्वी पिंपळाजवळील, श्री विठ्ठल रखुमाई मंदिराजवळील तसेच हनुमंत सावंत यांच्या घराजवळील विहिरींचे पाणी घरगुती वापरासाठी घेतले जात होते. मात्र, नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर विहिरींकडे दुर्लक्ष झाले. परिणामी त्यांची देखभाल न झाल्याने पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही.

चतुर्थीपूर्वीच नळाला अनियमित पाणी येण्यास सुरुवात झाली होती. बेटावरील अनेक घरे उंचावर असल्याने उच्च दाबाने पाणीपुरवठा झाल्यासच तेथे पाणी पोहोचते. कमी दाब असल्यास नागरिकांना रात्रभर जागून थोडे-थोडे पाणी साठवावे लागते. उत्तर चतुर्थीच्या काळात ही समस्या अधिक गंभीर झाली.

पाणी खात्याच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, उच्च दाबाने पाणीपुरवठा केल्यास जलवाहिनी फुटण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना त्रास सहन करत चतुर्थी साजरी करावी लागली.

पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असून, स्वयंपाक, साफसफाई तसेच इतर घरगुती कामांसाठी पाणी साठवून ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पाणी भरण्यासाठी अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी केवळ तात्पुरती नव्हे, तर कायमस्वरूपी उपाययोजना करून आखाडा बेटावरील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विहिरी स्वच्छ करा!

पाणी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. तसेच पंचायतीने विहिरींची स्वच्छता करून किमान वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vhalshi Lake: व्हाळशी तळ्याची संरक्षक भिंत खचली, भिंतीला तडे; दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं दुरुस्तीची मागणी

Success Story: अपुरे नेटवर्क, आर्थिक अडचणी... तरीही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वैभवीची 'IIT'पर्यंत मजल! राज्‍यातील एसटी समाजातील पहिली पदवीधर

Gajkesari Rajyog 2026: गुरु-चंद्र युतीचा चमत्कार! 4 ऑक्टोबरपासून 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; गजकेसरी राजयोग ठरणार वरदान

Shocking Viral Video! चालत्या ट्रेनमध्येच प्रवाशानं केली लघवी; संतापलेल्या सहप्रवाशांनी घेरलं, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Junta House Demolition: पणजीतील 'जुन्ता हाउस'च्या पाडकामाला लवकरच सुरुवात, चोहोबाजूंनी पडद्याचे संरक्षण; इमारतीतील साहित्य हटवले

SCROLL FOR NEXT