Ajay Kholkar Disciplinary Action Dainik Gomantak
गोवा

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Ajay Kholkar Expelled From RGP: रिव्हॉल्युलशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रिव्हॉल्युलशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांच्याकडे सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रवीण हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चौकशीत पक्षाच्या नोंदी, कागदपत्रे, समाजमाध्यमांवरील मजकूर, प्रसारमाध्यमांतील वृत्ते आणि अन्य उपलब्ध माहिती तपासण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. खोलकर यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे.

अन्य गुन्ह्यांबाबतही कारवाईची शिफारस

समितीच्या शिफारशी स्वीकारून बोरकर यांनी खोलकर यांच्या हकालपट्टीचा आदेश दिला. यापुढे खोलकर यांना ‘आरजीपी’च्या वतीने कोणतेही प्राधिकरण, प्रसारमाध्यमे किंवा जनतेसमोर प्रतिनिधित्व करता येणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. कथित चोरी, फसवणूक, बदनामी आणि अन्य गुन्ह्यांबाबत कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कारवाई करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT