Goa politics Dainik Gomantak
गोवा

Goa politics: "जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पसरवली!" फेरफार केलेल्या व्हिडिओ प्रकरणावरून, अजय खोलकर यांचा थेट आरोप

Ajay Kholkar video Morphing Allegation: आमदार वीरेश बोरकर यांच्याशी संबंधित गटच ‘व्हिडिओ मॉर्फिंग’मागे असल्याचा आरोप अजय खोलकर यांनी गुरुवारी (ता.१६) केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आमदार वीरेश बोरकर यांच्याशी संबंधित गटच ‘व्हिडिओ मॉर्फिंग’मागे असल्याचा आरोप अजय खोलकर यांनी गुरुवारी (ता.१६) केला. जनतेची दिशाभूल करण्यासाठी समाजमाध्यमांवर अशी फेरफार करून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

त्यामुळे याप्रकरणी जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. खोलकर यांनी सांगितले की, आम्ही ‘सायबर सेल’कडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर पावले उचलावीत. खोट्या माहितीची अनेक पेजेस तयार केली गेली आहेत.

दरम्यान, बोरकर यांच्या बंगल्याबद्दल आपणास काहीही माहिती नाही. त्याचप्रमाणे ‘आरजी’चे माजी प्रमुख मनोज परब यांना गणेशचतुर्थी साजरी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आमदार बोरकर यांना त्यावेळी उपस्थित राहायचे असेल तर ते राहू शकतात; पण मी बोरकर यांना आमंत्रित करणार नाही, असे खोलकर यांनी सांगितले.

नोटिसांना प्रतिसाद नाही!

बोरकर यांना पाचवेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली; पण आतापर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचा बोरकर यांचा दावा खोटा आहे. आमदार बोरकर यांनी पक्षाकडून लढणार असल्याचे म्हटले असले तरी शेवटी तिकीट देण्याचा अधिकार कार्यकारी समितीचा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत काम करू नये, पक्षात येऊन काम करावे, असे खोलकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

VIDEO: 'अमेरिका-पाक युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानसोबत!'; राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ, काँग्रेस-आप आक्रमक

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

SCROLL FOR NEXT