Ajay D Theophilus Dainik Gomantak
गोवा

Goa FOGA News: 'INS विक्रमादित्य'वर मिग-29 उतरवणारे पहिले पायलट थिओफिलस गोव्यात; नवीन FOGA म्हणून नियुक्ती

पदभार स्विकारला; गोव्यातील INS हंसा वर पार पडला कार्यक्रम

गोमंतक ऑनलाईन टीम

Flag Officer Commanding Goa Area Ajay D Theophilus: रिअर अॅडमिरल अजय डी. थिओफिलस यांनी मंगळवारी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया (FOGA) म्हणून पदभार स्विकारला. रिअर अॅडमिरल विक्रम मेनन यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्विकारली. वास्कोतील INS हंसा येथे झालेल्या सेरेमोनियल परेडवेळी हा कायक्रम झाला. 'INS विक्रमादित्य'वर मिग-29 के हे लढाऊ विमान उतरवणारे थिओफिलस ते पहिले पायलट आहेत.

भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की FOGA म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, रिअर अॅडमिरल अजय डी. थिओफिलस यांनी भारतीय नौदल अकादमीचे उप कमांडंट म्हणून काम केले आहे.

प्रभारी पदभार स्वीकारल्यावर रियर एडमिरल अजय डी. थिओफिलस यांनी INS गोमंतक, गोवा येथील युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

ते म्हणाले की, 1987 मध्ये भारतीय नौदलात रुजू झालो आणि 01 जुलै 1991 रोजी त्यांची कार्यकारी शाखेत नियुक्ती झाली. त्यांची जून 1992 मध्ये पायलटच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते नौदलाच्या विमान वाहतुकीच्या लढाऊ विंगमध्ये सामील झाले.

त्यांनी किरण, एचपीटी-32, मिग-21, सी हॅरियर आणि मिग-29 के विमाने उडवली आहेत. आयएनएस विक्रमादित्यवर मिग-29 के लँड करणारे ते पहिले भारतीय पायलट होते.

त्याने 2001 मध्ये फ्लाईंग इंस्ट्रक्टर्स कोर्स केला आहे आणि सी हॅरियर्स आणि मिग-29K विमानांचे प्रशिक्षक आहेत. त्याच्याकडे सी हॅरियर्सवर 1,000 तास आणि मिग-29K वर 700 तासांसह 3,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे, अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT