Goa Assembly Monsoon Session 2023 Day 11: पुन्हा मणिपूर, अपघात, कदंब, अ‍ॅप बेस टॅक्सी; आज विधानसभेत काय काय घडले?

दोन वर्षात वीज खात्यात 1200 वीज कर्मचाऱ्यांची भरती भरणार - वीज मंत्री ढवळीकर
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 11
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 11Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2023 Day 11: पावसाळी अधिवेशनाचा अकरावा दिवस प्रश्न काल विरोधकांच्या अुनपस्थित सुरू झाला. निलंबन कालावधी समाप्त झाल्यानंतर विरोधक सभागृहात आले तेव्हा त्यांनी मणिपूर हिंसाचारावर पुन्हा चर्चेची मागणी करत गोंधळ घातला.

दिवसभरात राज्यातील वीज समस्या, वाहतूक समस्या आणि वाढते अपघात, पंचायत यावर आमदारांनी मागणी कपात सत्रात त्यांची मते व्यक्त केली. यावर भाष्य करताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्यात अ‍ॅप बेस टॅक्सीची गरज पुन्हा व्यक्त केली.

काढा प्रकरण वर करूया चर्चा - मंत्री माविन आणि सरदेसाई भिडले

जीआय फंड स्ट्रिमलाईन करत आहोत त्यामुळे ते पंचायतीकडे पोहोचतील असे ग्वाही मंत्री माविन यांनी दिली. त्यानंतर माविन यांनी सरदेसाई देखील नगरनियोजन मंत्री होते, त्यांनी देखील स्ट्रिमलाईन केले आहेत, सगळ्या गोवेकरांना माहित आहे. असे माविन म्हणाले. त्यावरून दोघांमध्ये जुंपली आणि माविन तुमचे प्रकरण वर काढू का? असे म्हणाले. दरम्यान, सरदेसाई आक्रमक होत काढा प्रकरण वर करूया चर्चा अशी भूमिका घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी मध्यस्ती केली.

अ‍ॅप बेस टॅक्सीसाठी सर्वांनी समर्थन देऊया - वाहतूक मंत्री

राज्यातील वाहतूक व्यवस्थेची समस्या लक्षात घेता सर्व आमदारांनी अ‍ॅप बेस टॅक्सीसाठी सर्वांनी समर्थन देऊया असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

गोव्यातील वाहतूक व्यवस्था वाईट - मंत्री माविन गुदिन्हो

राज्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत दिवसभर राज्यातील विविध आमदारांनी समस्या मांडत काही मागण्या केल्या. तसेच, कंदब महामंडळाच्या फेऱ्या वाढवण्याच्या मागण्या सदस्यांनी केल्या. या प्रश्नावर उत्तर देताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्यातील वाहतूक व्यवस्था वाईट असल्याची हळहळ व्यक्त केली. जग तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जात असताना आपण मागेच राहत आहोत, त्यामुळे आपण पुढे जायचे की नाही याचा विचार करायला हवा असे गुदिन्हो म्हणाले.

कंदबाला गेल्या पाच वर्षात 55 कोटींचे नुकसान - विरोधीपक्षनेते आलेमाव

कंदब महामंडळाला मागील पाच वर्षांत तब्बल 55 कोटी रूपयांचा तोटा झाला आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली. तसेच, राज्यात पाच वर्षात 586 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. असेही आलेमाव म्हणाले.

गोव्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनांवर स्टिकर लावा - दिगंबर कामत

गोव्यात अनेक वाहनांना वाहतूक पोलिसांकडून अडवले जाते, चौकशी केली जाते. यामुळे पर्यटक आणि प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे सीमेवरून राज्यात येणाऱ्या वाहनांवर स्टिकर लावावे त्यानंतर त्यांना राज्यात फिरण्याची मोकळीक द्यावी असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

वाटल्यास मी पैसे देतो पण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको - फळदेसाई

मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेची अवस्था मांडताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ चालू आहे याचा एक प्रसंग सांगितला. आणि यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. वाटल्यास मी पैसे देतो पण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको अशी कळकळीची विनंती राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केली.

नौदलाचा कसा येतोय अडसर, आमदार साळकरांनी मांडली कैफियत

वास्कोचे आमदार साळकर यांनी नौदलामुळे परिसरात उभारण्यात येणाऱ्या बांधकाम, प्लॉट याबाबत अनेक अडसर येत आहेत. नौदल खाते अन्यायकारक पद्धतीने वागत असल्याची कैफियत साळकर यांनी मांडली. याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांंनी एक शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी अशा मागणी केली.

टिंटेट ग्लासवरून व्हेंझी व्हिएगश आक्रमक

माजी आमदार आणि त्यांचे पुत्र टिंटेट ग्लास लावून फिरत आहेत. परिवहन खाते आणि वाहतूक खाते त्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत. - व्हेंझी व्हिएगश

गोवा कार्बन फॅक्टरी बंद व्हायलाच पाहिजे -क्रुझ सिल्वा

गोवा कार्बन फॅक्टरी बंद व्हायला पाहिजे अशी मागणी वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली.

सचिवांच्या बदलीसाठी धोरण करण्याची गरज- सिल्वा

सचिवांच्या बदलीसाठी धोरण करण्याची गरज असल्याचे क्रुझ सिल्वा म्हणाले.

योजना फक्त नाव आणि जाहिरातीसाठी - वीरेश बोरकर

औद्योगिक विभागाने केलेल्या योजना फक्त नाव आणि जाहिरातीसाठी करण्यात आल्यात. योजनांची अंमलबजावणीच झाली नाही असा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी केला.

इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारा - जेनिफर मोन्सेरात

दरम्यान, जेनिफन मोन्सेरात म्हणाल्या की, पणजीचे बसस्थानक हे मॉडेल स्थानक झाले पाहिजे. पणजी हे राजधानीचे शहर आहे. सरकारने पुढाकार घेऊन हे काम केले पाहिजे. जग वेगाने इलेक्ट्रिक व्हेईकलकडे वळते आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन्स उभारण्याबाबत सरकारने वेगाने पावले उचलली पाहिजेत.

महिला आमदारांनी उपस्थित केला विद्यार्थ्यांना बसचा मुद्दा

सभागृहात तीन महिला आमदार आहेत. डॉ. देविया राणे, जेनिफर मोन्सेरात आणि दिलायला लोबो. या तिन्ही महिला आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदासंघात विद्यार्थ्यांना बसेसचा मुद्दा उपस्थित केला. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यांच्यासाठी बसची सोय झाली पाहिजे.

इलेक्ट्रिक वाहनांची सक्ती करण्यापुर्वी पायाभूत सुविधा उभारा  - आमदार दिलायला लोबो

आमदार दिलायला लोबो यांनीही शिवोलीमध्ये बसेस सुरू करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, इलेक्ट्रिक गाड्यांची सक्ती करण्याआधी पायाभूत सुविधा करा. इलेक्ट्रिक व्हेईकलची सक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. पण या वाहनांची किंमत जास्त आहे. शिवाय त्यासाठीच्या पायाभूत सुविधा नाहीत. त्यासाठीचे गॅरेज नाहीत. रेंट अ बाईक आणि रेंट अ कार मध्ये जर अशा महागड्या गाड्या दिल्या तर त्याचे भाडेही वाढेल. वाहतूक मंत्र्यांनी

वाळपईतून विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करा - आमदार डॉ. देविया राणे

आमदार देविया राणे म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघातील पंचायती आर्थिकृदृष्ट्या कमकुवत आहे. प्रत्येक पंचायतीला निधीची गरज आहे. एक ठराविक रक्कम नियमित मिळाली तर प्रलंबित लहान कामे पटपट होतील. त्यांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत नाहीत. वाळपईतून विद्यार्थ्यांसाठी नवीन बस सुरू व्हावी. काही मार्गांवर बसेस नियमित नाहीत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो.

काही सेक्रेटरी लोकप्रतिनिधींनाच शहाणपण शिकवतात - आमदार मायकल लोबो

आमदार मायकल लोबो म्हणाले, लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांना ताकद देण्यासाठी पंतायत राज व्यवस्था आली. सचिवांचा अॅटिट्युड योग्य नाही. तो बदलला. पाहिजे. ते लोकांचे सेवक आहेत. सरकारचे नोकर आहेत. ते लोकप्रतिनिधींना, मंत्री, आमदारांना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करतात. लोकांनाही शहाणपण शिकवतात. हे योग्य नाही.

औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण ही मोठी समस्या आहे. प्रकल्पांतील प्रदुषित पाणी जमिनीतच सोडले जात आहे. जिथे जंक्शन्स आहेत, वळणे आहेत, अपघात क्षेत्रे आहेत. तिथे जास्त लक्ष दिले पाहिजे. रस्त्यांवरीस साईनएजेस दिसत नाहीत. ते केले पाहिजेत.

राज्यातील वाढत्या अपघातांवर चर्चा व्हावी - आमदार मायकल लोबो

राज्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत बोलताना आमदार मायकल लोबो, दररोज अपघातात लोकांचा मृत्यू होत आहे. या वाढते अपघात हा इशारा आहे. रस्ते अपघातांची संख्या का वाढते आहे, त्याची कारणे काय आहेत, यावर चर्चा झाली पाहिजे.हाऊस कमिटी नेमा, थिंक टँक नेमा, त्यात आम्हाला घ्या, विजय सरदेसाई हुशार आहेत, त्यांना घ्या. यावर चर्चा झाली पाहिजे.

टुरिस्ट टॅक्सीचे भविष्य काय आहे. मीटरनुसार चालणार की कसेही? हा विषय सुटला पाहिजे. 500 रूपयांपर्यंतचे बिल ठिक आहे पण 4 हजार रूपये भाडे द्यावे लागत असेल तर ती फसवणूक आहे. ते वाईट आहे. ही लूट आहे.

कुणाला मु्ददाम लक्ष्य करत नाही - विजय सरदेसाई 

जीआय टॅग म्हणजेच भौगौलिक मानांकनाबाबत बोलताना विजय सरदेसाई म्हणाले, काजूला जीआय टॅग मिळाला. इतरही उत्पादनांना जीआय टॅग मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आयडीसीमध्ये शेकडो बेकायदा गोष्टी सुरू आहेत. बरेच बेकायदा गाळे, पार्किंग, कचरा, भंगार, गोडावून येथे आहे. यातून कुणाचा फायदा होत आहे? मी अनेक प्रश्न विचारले आहेत. मी कुणाला मुद्दाम लक्ष्य करत नाहीय. काहीवेळा सर्वांच्या भल्याचे प्रश्न उपस्थित करावे लागतात. मुद्दे उपस्थित करण्याचा अधिकार मला आहे.

कदंबा महामंडळाचे थडगे बनले आहे - विजय सरदेसाई यांची जहरी टीका

विजय सरदेसाई म्हणाले, कदंबा महामंडळाच्या कारभारावर टीका करताना विजय सरदेसाई म्हणाले की, कदंबा महामंडळाचे 'थडगे' झाले आहे. सर्वच ठिकाणी कदंबा स्थानकांची परिस्थिती वाईट आहे. 29 बसेस दुरूस्त करण्याची गरज आहे.

ते म्हणाले, एकीकडे सरकारला कर्नाटकमध्ये पाठवायला कदंबा बसेस आहेत. पण येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी बसेस नाहीत. शाळा, कॉलेजला विद्यार्थ्यांना जायला कदंबा बस नाही. बऱ्याचदा अनेक बसेस अचानक रद्द होतात. त्याचा अत्यंत वाईट फटका विद्यार्थ्यांना बसतो.

कॉलेज, विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होते. त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना सोयीस्कर अशा बसेस नियमित सुरू करा.

मंत्री काब्राल हे ऐका... सांताक्रुझ पंचायतीचा मटका कायदेशीर करण्याबाबत ठराव; विजय सरदेसाईंची टीका

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, सांताक्रुझ पंचायतीने ३० तारखेला ठराव घेतला आहे. तो ठराव आहे मटका कायदेशीर करण्याचा. याबाबत मंत्र्यानी उत्तर द्यावे. जीआय निधीबाबत आमदार खुष आहेत की नाहीत ते एकदा पाहा. अंतोदय म्हणजे तळागाळातील लोकांसाठीचे सरकार. पण ते या सरकारच्या कृतीत दिसत नाही. अनेक पंचायतींचे ऑडिटच झालेले नाही.

एखादा आमदार, मंत्री असे कसे म्हणू शकतो? - विजय सरदेसाई

विजय सरदेसाई म्हणाले की, निवडणूक सोपी जाईल, म्हणून सरकारने निधी खर्च केला पाहिजे, असे वक्तव्य एक आमदार, मंत्री कसे करू शकतो? इतका शिकलेला माणूस, अनुभवी माणूस असे कसे बोलू शकतो. माझ्या मतदारसंघात पंचायत नाही.

पण इतरांच्या मतदारसंघात पंचायती आहेत. त्यांना त्यांचा निधी मिळाला पाहिजे. जीआय निधी वाटपात भ्रष्टाचार झाला आहे. दरम्यान, सभागृहाचे कामकाज आता अडीच नंतर सुरू होणार आहे.

काळे कपडे परिधान करून विरोधक सभागृहात, वेलमध्ये उतरल्याने गदारोळ

विरोधकांना साडेबारा पर्यंत सभागृहात प्रवेश नव्हता. प्रश्नकाल संपल्यानंतर झीरो अवरमध्ये विरोधक सभागृहात आले. यावेळी सर्व विरोधकांनी काळे कपडे परिधान केले होते. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मणिपूरमध्ये झालेल्या महिलेच्या विटंबनेच्या घटनेवर चर्चेची मागणी केली. थोडा वेळ का असेना या मुद्यावर चर्चा व्हावी, असे सरदेसाई म्हणाले.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे, असे स्पष्ट केले.

कॉलेजने 3 किलोमीटर परिघातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास तक्रार करा- मुख्यमंत्री 

दरम्यान, सासष्टी तालुक्यातील अनुदानित आणि विनाअनुदानात उच्च माध्यमिक शाळांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, प्रवेशापासून कुणीही वंचित राहणार नाही. विविध अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकाला प्रवेश मिळेल.

शिक्षण खात्याच्या नियमानुसार 3 किलोमीटरच्या आतील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारायचा नाही. असे केल्यास थेट शिक्षण संचालकांकडे तक्रार करावी. 20 टक्के जागा या 3 किलोमीटर परीघातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील.

Goa Assembly opposition absent
Goa Assembly opposition absent Dainik Gomantak

विरोधकांच्या अनुपस्थितीत प्रश्न काल 

गोवा विधानसभा अधिवेशनात सोमवारी विरोधी पक्षातील सर्व सातही आमदारांचे चोवीस तासांसाठी निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे या विरोधी आमदारांना मंगळवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी प्रश्नकालात एकही विरोधी नेता उपस्थित नव्हता. विरोधकांच्या अनुपस्थितीतच प्रश्नकाल सुरू आहे.

विधवांनी गृह आधार योजनेसाठी अर्ज करावा - मंत्री सुभाष फळदेसाई 

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, एखाद्या महिलेचा पती, कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर गृह आधार योजनेत अर्ज करावा. तीन महिन्यात या योजनेतून अर्थसाह्य केले जाईल. दरम्यान, आमदार गणेश गावकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यातील कागदपत्रांंची अट शिथिल करावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली.

दोन वर्षात वीज खात्यात 1200 वीज कर्मचाऱ्यांची भरती करणार - वीज मंत्री ढवळीकर

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास मंगळवारी सुरवात झाली आहे. आमदार दिगंबर कामत यांनी वीज खात्यातील कमी मनुष्यबळाचा मुद्दा उपस्थित केला.कमी मनुष्यबळाने वीज खात्याच्या कामावर परिणाम होतो. लोकप्रतिनिधींकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत, असे कामत म्हणाले.

त्यावर वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी खात्यात एकूण किती पदे रिक्त आहेत, कुठली कुठली पदे रिक्त आहेत, याची माहिती दिली. गणेश चतुर्थीपर्यंत यातील बरीचशी पदे भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच आगामी दोन वर्षात 1200 कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची त्यांनी सांगितले. 400 लाईन्समनचा प्रश्न निकालात काढणार असल्याचेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com