Air India  Dainik Gomantak
गोवा

सिंगापूर सफारीची तिकिटे देताना हलगर्जीपणा केल्याने एअर इंडियाला दणका

ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा 9 प्रवाशांना दिलासा

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : सिंगापूर सफरीवर असताना प्रवाशांना योग्य प्रकारे तिकिटे न देऊन त्यांना मनस्ताप देण्याचा आरोप असलेल्या एअर इंडिया कंपनीला  उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका देताना 9 प्रवाशांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 5 हजार तर अन्य दोन प्रवाशांना प्रत्येकी अतिरिक्त 10 हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

चिखली मुरगाव येथे राहणारे प्रदीप सावईकर व अन्य आठ जणांनी नुकसान भरपाईसाठी या आयोगासमोर दावा केला होता. सेबस्तीयन वालीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बाळे व आवरेलियानो ओलीव्हेरा या त्रिसदस्यीय आयोगाने एअर इंडियाच्या सेवेत कमतरता असल्याचे सिद्ध झाल्याने वरील आदेश दिला. त्याशिवाय हा दावा लढविण्यासाठी वकिलांची मदत घेतल्यामुळे वकिलांची फी म्हणून आणखी 15 रुपये देण्याचा आदेश दिला.

23 सप्टेंबर 2019 रोजी हा दावा पेश केला होता. एकूण 10 प्रवाशांनी गोवा - सिंगापूर व परत यासाठी तिकीट बुक केली असता दाबोळी विमानतळावर त्यांना कन्फर्म तिकिटे दिली नाहीत. त्यामुळे चेन्नई विमानतळावर पोहोचल्यावर त्यातील दोन प्रवाशांना दुसऱ्या विमानाने सिंगापूरला जावे लागले. त्यांचे सामान थेट सिंगापूरला उतरविण्याचे असतानाही ते चेन्नई विमानतळावर उतरविल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. या संबंधी एअर इंडियाकडे तक्रार केल्यावर ज्या दोन प्रवाशांना दुसऱ्या विमानातून प्रवास करावा लागला त्यांना प्रत्येकी 10 हजार नुकसान भरपाई देण्यात आली होती.

मात्र ही कमी नुकसान भरपाई मान्य नसल्याने या प्रवाशांनी उत्तर गोवा जिल्हा आयोगाकडे दावा पेश करताना झालेल्या मनस्तापासाठी प्रत्येक प्रवाशाला 20 रुपयांची तसेच ज्या दोन प्रवाशांना विमान कंपनीच्या चुकीमुळे ताटकळत राहावे लागले त्यांना प्रत्येकी 40 हजार रुपये नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून 25 हजार रुपये अतिरिक्त देण्याची मागणी केली होती.

मात्र एअर इंडियाने आपल्याकडून सेवेत कुठलीही कमतरता झाली नासल्याचा दावा करून प्रवाशांतर्फे मागितली जाणारी नुकसान भरपाई अती असल्याची भूमिका घेतली होती. मात्र त्या दोन प्रवाशांना नुकसान भरपाई देताना दाबोळी विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे घोळ झाला हे एअर इंडियाने मान्य केल्याने प्रवाशांचा दावा योग्य असल्याचे नमूद करीत आयोगाने अंशतः नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT