एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांना अचानक 78 विमान उड्डाणे रद्द करावी लागली असून, कर्मचाऱ्यांची कमतरता हे त्याचे प्रमुख कारण आहे.
एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्स सामूहिक सीक लिव्ह घेतल्याने, कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना रजेची पूर्व सूचना देखील दिली नाही.
दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट्समध्ये गोव्यासह श्रीनगर, गुवाहटीचा देखील समावेश आहे. दिल्ली विमानळावरुन फ्लाईट्स अचानक रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. प्रवाशी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या एका ग्रुपने काल रात्रीपासून शेवटच्या क्षणी आजारी असल्याची तक्रार नोंदवली आहे, परिणामी अनेक फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या.
या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रू सदस्यांशी बोलत आहोत. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम काम करत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
नागरी विमान वाहतूक प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करत आहे. फ्लाईट रद्द झाल्याने फटका बसलेल्या बाधित प्रवाशांना संपूर्ण परतावा दिला जाईल किंवा त्यांच्याकडे त्यांचे फ्लाइट दुसऱ्या तारखेला रीशेड्युल करण्याचा पर्याय असेल, असेही कंपनीने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.