Goa-Delhi Flight | Air Indian  Dainik Gomantak
गोवा

Goa-Delhi Flight: विमानात प्रवाशाने केली एअरइंडियाच्या क्रु मेंबरला मारहाण; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील घटना

प्रवासी सुरक्षारक्षकांच्या ताब्यात

Akshay Nirmale

Goa-Delhi Flight: अलीकडच्या काळात विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाच्या अनेक घटना समोर आल्या. प्रवाशांचे हे गैरकृत्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच गोवा-दिल्ली फ्लाईटमध्येही एका प्रवाशाने एअरइंडियाच्या क्रु मेंबरला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

ही घटना सोमवारी घडली. गोवा-दिल्ली या AI882 फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला. या फ्लाईटमधील एका पुरुष प्रवाशाने सुरवातीला क्रु मेंबर्सना शिवीगाळ केली आणि नंतर क्रू मेंबरवर हल्ला केला. मारहाण केली.

विमान जेव्हा दिल्ली विमानतळावर उतरले तेव्हादेखीलया प्रवाशाचे बेशिस्त, बिनधास्त, आक्रमक वर्तन सुरूच होते. फ्लाईट दिल्लीत लँड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आम्ही देखील तक्रार केली आहे.

ही घटना नियामकांना कळवली आहे,” असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने मंगळवारी एका निवेदनातून सांगितले. अशी माहिती एअरलाईनच्या वतीने देण्यात आली आहे.

"आमच्या क्रू आणि प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही प्रवाशांच्या या अनियंत्रित वर्तनाचा तीव्र निषेध करतो. या घटनेतील क्रु सदस्यांना सर्व प्रकारची मदत देऊ," असे प्रवक्त्याने सांगितले आहे.

अशी वागणूक असणाऱ्या प्रवाशांना DGCA च्या नियमांनुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी उड्डाण बंदीचा सामना करावा लागू शकतो. नियमानुसार प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाचे तीन स्तरांत वर्गीकरण केले जाते.

शारीरिक हावभाव, शाब्दिक छळ आणि अनियंत्रित मद्यपान यासारखे अनियंत्रित वर्तन पहिल्या स्तरात समजले जाते. धक्का देणे, लाथ मारणे किंवा लैंगिक छळ असे वर्तन दुसऱ्या स्तरात आणि विमान कार्यप्रणालीचे नुकसान, शारीरिक हिंसाचार आणि खुनी हल्ला असे वर्तन तिसऱ्या स्तरात मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT