Goa Statehood Day: काय आहे गोवा घटकराज्य दिन? 7 पॉईंट्समध्ये जाणून घ्या, या दिवसाचे महत्व...

30 मे हा दिवस गोवा घटक राज्य दिन (Goa Statehood Day) म्हणून ओळखला जातो.
Goa Statehood Day
Goa Statehood DayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Statehood Day: गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे 26 वर्षानंतर गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. तो दिवस होता 30 मे 1987.

या दिवशी गोवा हे भारतातले 25 वे राज्य म्हणून उदयास आले. त्यामुळे 30 मे हा दिवस गोवा आणि गोमंतकीयांसाठी महत्वाचा आहे. जाणून घेऊया या दिवसाविषयी 7 पॉईंट्समध्ये...

Goa Statehood Day
New Parliament Murals: गोव्यातील आर्टिस्टला मिळाली नवीन संसदेत म्युरल्स साकारण्याची संधी

1) 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झाला. पण, गोवा मात्र तेव्हादेखील पोर्तुगीज अंमलाखालीच होता. पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त व्हावा यासाठी गोवा मुक्ती आंदोलन झाले. संघर्षानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाला.

2) स्वातंत्र्यानंतर सुरवातीची अनेक वर्षे गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता. गोवा हा प्रदेश सुरवातीची 10 वर्षे केंद्रशासित ठेवावा आणि त्यानंतर तो स्वतंत्र ठेवावा की महाराष्ट्र किंवा कर्नाटकात त्याचे विलीनकरण करावे, याबाबत निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यावरून खूप चर्चा आणि संघर्षही झाला.

3) गोवा आणि दमण व दीव मिळून एकच केंद्रशासित प्रदेश होता. विकासाच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरत होते. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रावर अवलंबून राहावे लागत होते. त्यातून अन्यायाची भावना गोमंतकीयांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातूनच घटकराज्याची मागणी पुढे आली. गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले.

4) 16 जानेवारी 1967 रोजी जनमत कौल घेण्यात आला. या जनमत कौलात नागरिकांना गोव्याचे इतर राज्यांमध्ये विलिनीकरण करण्याविरोधात मतदान केले. गोवा, दमण व दीव स्वतंत्र संघ प्रदेश म्हणून ठेवण्याचा निर्णय झाला. हा अशा पद्धतीचा भारतातला पहिला आणि एकमेव जनमत कौल होता.

Goa Statehood Day
Mahadayi Water Dispute: अखेर ‘म्हादई-प्रवाह’ अधिसूचित; पणजीत असणार कार्यालय, जाणून घ्या कसे असेल प्राधिकरण?

5) ऑक्टोबर 1976 मध्ये पुरषोत्तम काकोडकर यांनी लोकसभेत गोव्याला घटक राज्याच्या दर्जा देण्याबाबतचे खासगी विधेयक मांडले. 4 एप्रिल 1977 रोजी खासदार एदुआर्द फालेरो यांनी ईशान्येकडील मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, अरूणाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे गोवाही राज्य व्हावे, असा युक्तीवाद त्यांनी केला.

6) राजीव गांधी पंतप्रधान असताना गोव्याला पूर्ण राज्य बनविणारे विधेयक मंजूर करण्यात आले.

7) गोवा 30 मे 1987 रोजी स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले. घटकराज्य झाल्यानंतर गोव्याच्या विकासाला गती मिळाली. कमी काळातच गोवा एक विकसित राज्य म्हणून देशात पुढे आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com