Goa Electricity Issue  Dainik Gomantak
गोवा

Goa Student: विद्यार्थ्यांना वीज बचतीची सवय लावण्याचे ध्येय

Goa Student: वीज खात्याचा उपक्रम : प्रत्येक शाळेत ऊर्जा क्लब स्थापना सुरू, 'ऊर्जा कार्यक्षम शाळा' संकल्पना

अवित बगळेavit.bagle@esakal.com

Goa Student: विद्यार्थी दशेतच वीज वाचवण्याची सवय लावली तर पुढे ऊर्जेचे महत्त्व ओळखणारे नागरिक तयार होतील. वीज राज्याबाहेरून आणावी लागते, याची बहुतांश विद्यार्थ्यांना माहितीच नाही. त्यांना वीज खाते हेच वीज तयार करते व पुरवते असे वाटते. त्यामुळे वीज तयार न करणाऱ्या गोव्यासारख्या राज्यात वीज बचतीची सवय लागणे फार महत्त्वाचे आहे.

ही सवय रुजवण्यासाठी वीज खात्याच्या ऊर्जा कार्यक्षम शाळा संकल्पनेतून प्रत्येक शाळेत ऊर्जा क्लब स्थापन करणे सुरू केल्याची माहिती ट्रॅक चेन्ज या कंपनीचे संस्थापक अभिनव आपटे यांनी गोमन्तकला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी :

ही संकल्पना कशी राबवणार?

गेल्या वर्षी राज्य सरकारच्या ७८ व केंद्र सरकारच्या ७ मिळून ८५ हायस्कूल्समध्ये ऊर्जा क्लब स्थापन केले. यंदा उत्तर गोव्यातील १४५ व दक्षिण गोव्यातील १८३ अनुदानित हायस्कूल्समध्ये असे क्लब स्थापन करण्याची मोहीम सुरू झाली आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा बचत का केली पाहिजे हे पटवून दिले जाते. त्याचे अनुकरण त्यांनी सध्या शाळेत करणे अपेक्षित आहे. त्यानंतर घरी, शेजारी, वाड्यावर व गावात ऊर्जा बचतीचा संदेश पोचवावा, असे अभिप्रेत आहे. सध्या ही केवळ सुरवात आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

  • हे ऊर्जा क्लब म्हणजे काय?

एक शिक्षक व १५-२० विद्यार्थी यांचा समावेश असलेला तो एक क्लब असतो. त्याचे सदस्य विजेच्या बचतीवर काम करतात. एखाद्या ठिकाणी दोन पंखे सुरू आहेत आणि गरज एकाच पंख्याची असेल तर एक पंखा बंद करतात.

उजेड देणारे हवे तेवढेच दिवे सुरू ठेवतात. बाहेर जाताना विजेवरील उपकरणे बंद करतात. पंखा सुरू करण्यासाठी कोणते बटन, दिवा चालू करण्यासाठी कोणते बटन हे ठाऊक नसल्यास सगळी बटने सुरू केली जातात.

हे टाळण्यासाठी त्याची माहिती बटनावरच खुणेने कशी द्यायची याचे शिक्षण त्यांना दिले जाते. त्यांनी आपण याचे अनुकरण करावे व इतरांनाही ते शिकवावे, असे अपेक्षित आहे. या क्लबच्या सदस्यांना वीज बिल कसे वाचावे याचे प्रशिक्षण दिले जाते. विजेचा युनिट कसा मोजतात तेही सांगितले जाते.

  • विद्यार्थी बाब गांभीर्याने घेतात?

अर्थातच, आपले राज्य गरजेच्या केवळ ४ टक्के विजेचेच उत्पादन करू शकते. ९६ टक्के वीज इतरांकडून विकत घ्यावी लागते. ती दीडेक हजार किलोमीटरवरून आणावी लागते. ही माहिती विद्यार्थ्यांना दिल्यावर त्यांना वीज बचतीचे गांभीर्य समजू लागले आहे. यामुळे मेरशीत विद्यार्थ्यांनी वीज वाचवा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंप्रेरणेने फेरी काढली. मुरगावमध्ये विद्यार्थ्यांनी गृहनिर्माण संकुलात जाऊन जागृती केली, स्टीकर वाटले. लिफ्टमधील पंखा लिफ्टमधून बाहेर जाताना बंद करावा, असे आवाहन त्यांनी केले. काहीजण पथनाट्यांच्या माध्यमातून हे सारे करत आहेत. केवळ स्वयंप्रेरणेने हे सारे होत आहे. हे चित्र फार आशादायी आहे.

  • विद्यार्थ्यांना या विषयात रस आहे तर?

अर्थातच, विजेवरील विविध उपकरणांवर वेगवेगळ्या संख्येने तारे रेखाटलेले असतात. त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यावर आपण किती तारे असलेली उपकरणे वापरावीत हे ते घरातील लोकांना सांगू लागले आहेत. गरज नसताना विजेचा वापर करू नका यासाठी ते आग्रही असतात. हेच विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे उद्याच्या गोव्यात विजेची उधळपट्टी नसेल असे चित्र तयार होण्यासाठी हे प्रयत्न आहेत. यात शिक्षकांचेही प्रयत्न मोलाचे आहेत. गेल्यावर्षी सरकारी हायस्कूलमधील क्लबांच्या कामाचा आढावा घेऊन १४ डिसेंबरला पहिल्या तीन क्रमांकांच्या तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवलेल्या शाळांतील क्लबना गौरविण्यात आले होते. त्यामुळे स्पर्धेसाठीही म्हणून अनेक उपक्रम होत आहेत.

  • सध्या ही जनजागृती कुठवर आली आहे?

विजेचा कमीत कमी वापर करणे म्हणजेच वीज बचत होय. हा संदेश देण्यासाठी पेडणे तालुक्यातील सर्व अनुदानित शाळांमध्ये क्लब स्थापन झाले आहेत. बार्देशमधील बहुतांश शाळांत आणि डिचोली तालुक्यातील काही शाळांत क्लब स्थापन केले आहेत. काही ठिकाणी परीक्षा सुरू आहेत. हे काम आपल्या गतीने पुढे सरकत राहणार आहे. याचा प्रभाव आता जाणवत नसला तरी विजेची बचत मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यावर विजेची मागणी व पुरवठा यांच्यातील तफावत काही अंशाने तरी कमी होईल यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT