Bhoma Road Issue: भोम रस्त्याला जनतेचा विरोध कायमच

Bhoma Road Issue: सडेतोड नायक : संजय नाईक आक्रमक; गिरिराज म्हणतात जनता सरकारसोबत
Boma Road Issue:
Boma Road Issue: Dainik Gomantak

Bhoma Road Issue: भोममधून 60 मीटर रुंदीचा रस्ता जाणार आहे. गावाची रुंदी 20 मीटर असताना सरकार केवळ 4 घरेच जाणार असल्याचे सांगते, यावर आम्ही विश्‍वास कसा ठेवावा. आम्हाला अजून आराखडाच दाखविण्यात आलेला नाही. जोपर्यंत सरकार भोमच्या नागरिकांना विश्‍वासात घेत नाही, तोपर्यंत या रस्त्याला आमचा विरोध कायम राहणार असल्याचे प्रतिपादन भोमचे रहिवासी संजय नाईक यांनी केले.

Boma Road Issue:
Goa: सिडास चॅपल, कोमुनिनाद तुरुंग

ते गोमन्तक टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यात भाजप प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकरही सहभागी झाले होते.

दरम्यान, नाईक म्हणाले, सरकार जे तोंडी सांगत आहे की चार घरे जातात ते आम्हाला त्यांनी कागदोपत्री दाखवावे. आमच्या देवस्थानालादेखील या रस्त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

भोम रस्त्यासाठी सरकारने सर्व बाबींचा विचार करून अतिशय पारदर्शकपणे निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांपासून काही लपविण्याचा प्रश्‍नच येत नाही. या रस्त्याला विरोध करणाऱ्यांनी पहिल्यांदा घरे जाणार, नंतर मंदिराला धोका असल्याचे सांगत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु भोमची जनता आमच्यासोबतच असल्याचे पै वेर्णेकर यांनी सांगितले.

सरकारने कागदोपत्री बोलावे

ज्यावेळी पहिल्यांदा हा भोममधून रस्ता करण्यात येणार होता तेव्हा हा आरखडा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रद्द करून त्याला पर्यायी रस्त्याची तरतूद करण्यात आली होती. नंतर २०१६ साली पुन्हा रस्ता भोममधूनच करायचे ठरविले, त्यावेळीदेखील लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तो रद्द केला;

परंतु आता आम्हा भोमवासीयांना विश्‍वासात न घेताच रस्ता करू इच्छित आहेत. त्यामुळे आम्हाला अजून आराखडा न दाखविल्याने किती घरे यात जातात, काय घडणार आहे, याबाबत कल्पना नाही. सरकारने आम्हाला रस्ता कोठून जाणार आहे, यात किती घरे जाणार आहेत हे कागदोपत्री दाखवावे, असे संजय नाईक यांनी सांगितले.

Boma Road Issue:
Goa Mining Issue: जनतेचा खाणप्रश्‍नी लढा

वैयक्तिक स्वार्थासाठीच विरोध

पूर्वी जो गाव वगळून रस्ता करण्याचा पर्याय होता तो भाग आता पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून रस्ता काढणे आता शक्य नाही. आणखी एक दुसरा पर्याय आहे; परंतु तेथून जर रस्ता केल्यास 70 ते 80 शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहे, त्यामुळे सरकारने जो पर्याय निवडला आहे त्यात केवळ भोममधील 4 घरे जातात. इतरांना काहीही त्रास होणार नाही. तेथील मंदिरांना जत्रेदरम्यान कोणताच त्रास होणार नाही. अनेक लहान-सहान व्यावसायिक आहेत. ज्यांना सद्यस्थितीत परवाने नाहीत. त्यांना तेथे गाळे मिळतील. काही मोजकेच लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध करत असल्याचे भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com