Health Minister Vishwajit Rane And Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

AIIMS In Goa: गोव्यात येणार एम्स रुग्णालय, कॅन्सरसाठी मिळणार 'प्रोटॉन थेरपी'; आरोग्यमंत्री राणेंची माहिती

Cancer Treatment: राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी एचएलएल या केंद्रीय संस्थेशी चर्चा करणार असून लवकरच त्यांच्याशी करारही करणार असल्याचे राणे म्हणाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: केंद्र सरकारने अनेक राज्यांमध्ये एम्स हॉस्पिटल सुरू केले असून गोव्यातही एम्ससारख्या इस्पितळाची गरज आहे. मी लवकरच दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन एम्स हॉस्पिटलसाठी पाठपुरावा करणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मडगावात सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, प्रोटॉन थेरपी ही कर्करोगावरील प्रभावी उपचार पद्धती सध्या प्रचलित असून तीसुद्धा गोव्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एम्स हॉस्पिटलला मान्यता मिळाली तर नेमके हे हॉस्पिटल कुठे उभारले जाईल, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

मान्यता मिळाल्यावर त्यासाठी जागेचे सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी एचएलएल या केंद्रीय संस्थेशी चर्चा करणार असून लवकरच त्यांच्याशी करारही करणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे, कर्मचारी व तांत्रिक ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची सोय होईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय पर्यटनावर भर

वैद्यकीय पर्यटन अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या साधनसुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी माझा सदैव प्रयत्न असतो. सर्वसामान्यांच्या राहणीमानामध्ये परिवर्तन आणण्यासाठी आरोग्य सेवा गरजेची आहे. त्यासाठी जेनेरिक व हृदय चाचणी सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे राणे म्हणाले.

यकृतावरील उपचार सुरु करणार

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात यकृतावरील उपचार सुरू करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. कर्करोग उपचारासाठी गोव्याने यापूर्वीच टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत करार केला आहे. कर्करोग निर्मूलनावर आपला जास्त भर आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT