Goa Traffic AI System  Dainik Gomantak
गोवा

AI चा दणका! गोव्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या 16,000 जणांना घरपोच नोटिसा; 40.81 लाखांची दंड वसुली

Goa Traffic Violation: वाहतूक पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात (जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये) ८५४८ वाहनांविरुद्ध नियम उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Violation

पणजी व परिसरात १३ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करून घरपोच दंडात्मक नोटीस पाठवण्यात येत आहेत.

गेल्या ४ महिन्यात वाहतूक खात्याने १६,२०२ वाहन मालकांना नियम उल्लंघनप्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यापैकी ३,५४७ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहे व ४०.८१ लाखांची दंड वसुली केली आहे.

ही ‘एआय’ सुविधा बसवण्यात आली असली तरी नियम उल्लंघन करण्याची भीती चालकांमध्ये नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यतः जंक्शनवर सीसीटीव्ही कॅमेरे पणजी, पर्वरी, मेरशी सर्कल, चिंबल तसेच ताळगाव पठार या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. या भागात १३ ठिकाणी हे कॅमेरे आहेत.

ताळगाव पठार येथील रस्त्यावर एआय सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याची माहिती काही वाहन चालकांना नाही, त्यामुळे भरधाववेगाने वाहन हाकण्याच्या तसेच वाहतूक सिग्नलच्या ठिकाणी न थांबण्याची अनेक प्रकरणे नोंद होत आहेत.

मेरशी सर्कल येथे तसेच चिंबल जंक्शन येथे रात्रीच्यावेळी काही वाहने वाहतूक सिग्नल तोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. पर्वरी येथे असलेल्या सिग्नलच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघनाचे प्रकरणे कमी नोंद झाली आहेत.

आयए या यंत्रणेसाठी वन भवनमध्ये असलेल्या कार्यालयातून नियम उल्लंघन केलेल्या वाहन मालकांना तेथील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नोटीस बजावण्यास विलंब होत आहे. या नोटिसा वाहतूक खात्यातर्फे संबंंधित मालकांना पाठवण्यात येत असल्याची माहिती या खात्याच्या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात (जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये) ८५४८ वाहनांविरुद्ध नियम उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्यापैकी ६९७७ चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्याला शिफारस केली होती.

मार्च २०२४ पर्यंत ४०२५ चालकांचा वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. भरधाववेगप्रकरणी ५५५८ प्रकरणे नोंद झाली आहेत त्यापैकी ५०३५ चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी शिफारस केली आहे.

जानेवारी ते एप्रिलपर्यंत ‘एआय’कडे

- १६,२०२ प्रकरणे नोंद

- ३५४७ वाहन मालकांना नोटीस

- १२,६५५ जणांना नोटीस बजावणे बाकी

- १.७० कोटींचा दंड महसूल येणार

- २.११ कोटींचा दंड महसूल नोंद

(नियम उल्लंघन - प्रकरणे नोंद - परवाने निलंबनाची शिफारस)

- भरधाव वेग - ५५५८, ५०३५

- वाहतूक सिग्नल तोडणे - ३८१, ३७९

- मालवाहू वाहनात प्रवासी - ४०६, १८८

- वाहनावर मोबाईल वापरणे - १२७१, ७४३

- ड्रग्ज व मद्यपान प्रकरणे - ९३२, ६३२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

SCROLL FOR NEXT