Goa Viral Stunt Dainik Gomantak
गोवा

Goa Helipad Viral Stunt : रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

Aguada Helipad Reel Stunt: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि रील व्हायरल करण्याच्या नादात पर्यटकांकडून जीवघेणे स्टंट करण्याचे प्रकार गोव्यात सातत्याने समोर येत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि रील व्हायरल करण्याच्या नादात पर्यटकांकडून जीवघेणे स्टंट करण्याचे प्रकार गोव्यात सातत्याने समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर गोव्यातील प्रसिद्ध आग्वाद हेलिपॅड परिसरात घडला.

रिलच्या चित्रीकरणादरम्यान चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने चालत्या वाहनाच्या छतावर उभे असलेले तीन पर्यटक थेट खाली रस्त्यावर कोसळले. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून, घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आय लव्ह गोवा’ असे लिहिलेले टी-शर्ट घातलेल्या पर्यटकांचा एक गट आग्वाद हेलिपॅडवर रिल बनवत होता. ‘बाहुबली’ चित्रपटातील एका प्रसिद्ध दृश्याची नक्कल करण्याचा प्रयत्न हे पर्यटक करत होते.

दरम्‍यान, आग्वाद हेलिपॅड परिसरात सुरक्षारक्षक किंवा पोलिसांची पुरेशी व्यवस्था नसल्याने अशा धोकादायक स्टंटना वाव मिळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाहनचालकाने ब्रेक लावला अन्‌...

पर्यटकांचा हा गट ‘बाहुबली’ चित्रपटातील दृश्याची नक्कल करून रिल बनवत होता. एका तरुणाने स्वतःला दोरी बांधून ट्रॅक्स गाडी ओढण्याचा आव आणला होता. तर इतर तिघे चालत्या वाहनाच्या छतावर उभे राहून फिल्मी पोझ देत होते. याचवेळी वाहनचालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्यांचा स्टंट चांगलाच अंगाशी आला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आग्वाद हेलिपॅडवर घडलेला हा धक्कादायक प्रकार स्थानिक नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. अपघातानंतर पर्यटकांची झालेली अवस्था आणि जखमी तरुणाच्या कपाळातून होणारा रक्तस्राव व्हिडिओत दिसत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT