Agriculture officials to visit every panchayat from next week Dainik Gomantak
गोवा

येत्या आठवड्यापासून कृषी अधिकाऱ्यांची प्रत्येक पंचायतीला भेट

शेतकऱ्यांच्या समस्या गाव पातळीवरच सुटाव्या यासाठी प्रयत्न

दैनिक गोमन्तक

मडगाव : शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या समस्यांवर गाव पातळीवरच तोडगा काढावा यासाठी कृषी खात्याने पंचायतींना भेटी देण्याचा कार्यक्रम सुरू करण्याचे ठरविले असून त्यानुसार पुढच्या आठवड्यापासून कृषी अधिकारी आठवड्यात एकदा पंचायतीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे.

सासष्टी व मुरगावचे विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी ही माहिती दिली. दोन्ही तालुक्यातील सर्व पंचायतीमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून दर पंचायतीसाठी आठवड्याचा दिवस ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे अधिकारी शेतकऱ्यांसाठी सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती देण्याबरोबरच शेतकऱ्यांना कृषी कार्डे तयार करून द्यायची असल्यास ती देणार आहेत. त्याशिवाय जर कुणाच्या शेतीची किंवा लागवडीचे नुकसान झाले असल्यास त्याची पाहणी करून त्या शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई कशी मिळू शकेल त्यासाठी मदत करतील असे फुर्तादो यांनी सांगितले.

सध्या येथील कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना खते आणि बियाणी देण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी ती घेण्यासाठी कार्यालयाबाहेर रांगा लावल्याचे दिसून येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: 'फोंड्याची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, मी नाही'; CM सावंत

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

ड्रग्ज का दारुची नशा? झिंगलेल्या रशियन महिलेचा शिवोलीत भररस्त्यात राडा, वाहनं अडवली, पोलिसांशी घातली हुज्जत

Goa Rain: तुळशीच्या लग्नाला 'पावसाच्या' अक्षता? शेतकरी हवालदिल; ‘व्हडली दिवाळी’वर पावसाचे सावट

SCROLL FOR NEXT