कुर्टी-खांडेपार ग्रामसभेत स्क्रॅप यार्डच्या विषयावरून ग्रामस्थांचा गदारोळ

ग्रामसभेला पंचसदस्यांची अनुपस्थिती आणि बेकायदा बांधकामे यावरून ग्रामस्थांनी गदारोळ केला.
Curti-Khandepar Panchayat
Curti-Khandepar Panchayat Dainik Gomantak

फोंडा : कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेत ऐरणीवर आलेला स्क्रॅप यार्डचा विषय त्याचबरोबर ग्रामसभेला पंचसदस्यांची अनुपस्थिती आणि बेकायदा बांधकामे यावरून ग्रामस्थांनी गदारोळ केला. या ग्रामसभेला 11 पैकी पाच पंचसदस्य गैरहजर होते. त्यामुळेही ग्रामस्थांचा पारा चढला.

Curti-Khandepar Panchayat
खंदकामधील पाण्यामुळे पैरा गाव संकटाच्या छायेत

पंचायत क्षेत्रातील 11पैकी आठ भंगार अड्डे पाडण्यात आले आहेत. एका भंगार अड्ड्याच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे, तर अन्य दोन अड्ड्यांच्या मालकांना पंचायतीने नोटिसा पाठवल्या आहेत. तरीही या दोनपैकी एका भंगार अड्ड्याचा परवाना भलत्या व्यक्तीच्या नावाने नूतनीकरण केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. यासंबंधीची सविस्तर माहिती ग्रामस्थांनी मागितली आहे.

ग्रामसभांना अनुपस्थित राहणाऱ्या पंचसदस्यांवर कारवाई करायला हवी, असेही मत काही ग्रामस्थांनी मांडले. ग्रामसभेच्या सुरवातीला सरपंच दादी नाईक यांनी स्वागत केले, तर पंचायत सचिवांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर विविध विषय चर्चेला आले. येथील मारुती आस्थापनासमोर असलेल्या एका छोट्या आस्थापनाच्या जागी तीन मजली बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, या बांधकामाला पंचायतीने कोणताही परवाना दिलेला नाही. मग संबंधित आस्थापन एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम कसे काय करू शकते, असा सवाल ग्रामस्थांनी केला. यासंबंधीच्या खुलाशाचीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर भंगार अड्ड्यांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल सरपंच दादी नाईक यांनी आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप पारकर यांचे अभिनंदन केले. याबद्दल इतर ग्रामस्थांनीही पारकर यांचे अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com