Agriculture Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Agriculture Minister Ravi Naik: फोंड्याला चांगले ते नेहमीच दिले..!

कृषिमंत्री रवी नाईक- फोंडा पालिकेच्या मार्केट शेडसह इतर कामांचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Agriculture Minister Ravi Naik: फोंडा मतदारसंघातील नागरिकांना जे चांगले ते देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला असून फोंड्यातील विविध विकासकामे त्याची साक्ष आहेत. फोंड्यातील मार्केट संकुलात ग्राहक आणि विक्रेत्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक योजना आखण्यात येत आहे.

विक्रेते व ग्राहकांना मार्केट संकुलावरील शेड बांधून दिलासा देण्यात फोंडा पालिकेने केलेली कार्यवाही स्तुत्य असून फोंड्यातील विकासकामांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

फोंडा पालिकेच्या वरचा बाजार भागातील मार्केट संकुलाच्या तळमजल्यावरील छतावर विक्रेत्यांसाठी शेड उभारून वाहन पार्किंगच्या जोडभागाचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच एमआरएफ कंपनीतर्फे मार्केटमधील सुमारे आठ लाख रुपयांची ‘सीएसआर'' निधीखालील जुजबी विकासकामे व उपलब्ध करून दिलेल्या स्वच्छता कुपाचे उद्घाटन कृषीमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष व इतर नगरसेवकांची उपस्थिती होती.

रवी नाईक म्हणाले की, या मार्केट संकुलावर शेड उभारणे आवश्‍यक होते, त्यासाठी योग्य कार्यवाही झाल्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले. विक्रेते व ग्राहकांना मार्केटमध्ये आल्यानंतर कोणतीच असुविधा भासणार नाही यासाठी पालिकेने केलेल्या कार्यवाहीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीखाली अनेक कामे हाती घेतली जाऊ शकतात, त्यात एमआरएफ कंपनीने उपलब्ध केलेल्या स्वच्छतागृह कूप तसेच पीईएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या बसगाडीबद्दल त्यांनी एमआरएफ व्यवस्थापनाचे आभार मानले.

‘मास्टर प्लॅन’ लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध

नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले की, फोंडा पालिकेच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील अनेक कामांना चालना देण्यात येत आहे. मागच्या काळातील अनेक प्रकल्पाची कामे मार्गी लागली असून सुमारे पंधरा कोटी रुपये खर्चून मासळी तसेच इतर वस्तूंचे मार्केट संकूल उभारण्यात येत आहे.

विद्यमान विक्रेत्यांची सोय नवीन शेडमध्ये तसेच इतर ठिकाणी करण्यात येणार असून नव्याने येणाऱ्या गोमंतकीय विक्रेत्यांनाही संधी दिली जाईल. येत्या महिन्यात फोंड्याचा मास्टरप्लॅनही नागरिकांसाठी उपलब्ध केला जाईल. नागरिकांच्या सूचना व हरकती लक्षात घेऊनच या मास्टरप्लॅनची कार्यवाही केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

VIDEO: गोव्यात रशियन कुटुंबाकडून बेकायदेशीर 'टॅक्सी व्यवसाय'; यांना कोणाचा 'आशीर्वाद'? स्थानिकांचा सवाल

Mormugao Port: मोठी बातमी! मुरगाव बंदरात कंटेनर व्यवसाय सुरू, SCI जहाज दाखल; ‘एमपीए’बरोबरच राज्यालाही होणार लाभ

Konkani Drama Competition: 'हा कोकणी लेखकांचा अनादर, नाट्य चळवळीला मारक'; राज्यनाट्य स्पर्धा आणि वादांचे साद-पडसाद

Horoscope: धन, यश आणि प्रगती! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 राशींसाठी महायोग, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT