Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

कृषिमंत्री रवी नाईकांना ‘हेरंब’ पावला!

गोष्ट बंगल्याची: ढवळीकरांनी बांधलेल्या घरात आता कट्टर विरोधक नाईक राहणार

दैनिक गोमन्तक

पणजी: मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आणि सचिवांना राज्याची राजधानी पणजीत राहता यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने आल्तिनो येथील सुसज्ज बंगले वितरित करण्यात येतात. यातील सर्वात चर्चेचा बंगला म्हणजे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर ‘हेरंब’ हा होय. या बंगल्यासाठी अनेक मंत्र्यांची मागणी असते. अलीकडच्या काळात मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीच या बंगल्यात राहत असे. या परंपरेला छेद देत आता कृषिमंत्री रवी नाईक यांनी हा बंगला सर्वात पहिल्यांदा आपल्या पदरात पाडून घेतला आहे. अर्थात रवी नाईक आणि या बंगल्याचं नातही जुनेच आहे.

आमदार सुदिन ढवळीकर कॉन्ट्रॅक्टर असताना त्यांनीच हा बंगला बांधला होता. विशेष म्हणजे मंत्री झाल्यावरही ते पहिल्यांदा याच बंगल्यामध्ये राहावयास आले. त्यामुळे त्यांचे या बंगल्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते समजून येते. मात्र, त्यांचे कट्टर राजकीय शत्रू रवी नाईक यांनाही हा बंगला विशेष आवडतो. मागे गृहमंत्री असताना ही काही दिवस ते या बंगल्यामध्ये होते. त्यामुळे अंत्रुज महालातील या दोन मातब्बर ज्येष्ठ नेत्यांच्या दृष्टीने हा बंगला जास्त महत्त्वाचा आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावस्कर येथे होते.

दरम्यान, सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल अशी एक चर्चा आहे. यदाकदाचित मंत्रिपद मिळाल्यानंतर ढवळीकर ‘हेरंब’कडे जातील अशी शक्यता आहे. ढवळीकर आणि रवी नाईक हे दोघेही गणपतीचे भक्त आहेत. रवी नाईक यांच्याकडे तर गणपतीच्या शेकडो मूर्त्या आहेत. त्यामुळेच पुन्हा रवी नाईक यांनी हा ‘हेरंब’ बंगला सर्वात पहिल्यांदा आपल्या पदरात पाडून घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

Bicholim: डिचोलीतील ‘पे पार्किंग’ प्रस्ताव अजूनही घुटमळतोय! कंत्राटदार कंपनीचा प्रतिसाद नाही; पालिकेसमोर प्रश्नचिन्ह

Goa Crime: कारमधून ओढून शेतात मारहाण, स्क्रूड्रायव्हर - फोन जप्त; रेहबर खान हत्याप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला

Laxmidas Borkar: गोमंतपुत्राचा गौरव! स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार 'लक्ष्मीदास बोरकर' यांच्या सन्मानार्थ टपाल साहित्य प्रकाशित

SCROLL FOR NEXT