Olive Ridley  dainikgomantak
गोवा

Sea Turtles: आगोंद, गालजीबाग किनाऱ्यावर 19 सागरी कासवांचे आगमन; 2026 अंड्यांची नोंद

Agonda Galgibaga Sea Turtles: साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून सागरी कासवांचे आगमन अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर होत असते.ते काही वेळा हे महिन्यापर्यंत चालू असते.

Sameer Panditrao

काणकोण: येथील आगोंद व गालजीबाग किनाऱ्यावर १९ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी एकूण २०२६ अंडी घातली आहेत. त्यापैकी सहा घरटी गालजीबाग व तेरा घरटी आगोंद किनाऱ्यावरील आहेत. गालजीबाग किनाऱ्यावर सहा कासवांची ७०७ अंडी घातली आहेत. आगोंद किनाऱ्यावर तेरा कासवांनी १३१९ अंडी घातली आहेत.

आगोंद किनाऱ्यावर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन ऑलिव्ह रिडले कासवांची १७२ अंडी घातली. मात्र डिसेंबरपर्यंत गालजीबाग किनाऱ्यावर सागरी कासवांचे आगमन झाले नव्हते. संपूर्ण गालजीबाग किनारा व आगोंद किनाऱ्याचा काही भाग सागरी कासवांसाठी आरक्षित आहे.

आगोंद किनारा पर्यटन व्यवसायाने गजबजलेला असूनही या किनाऱ्यावर सर्वाधिक सागरी कासवांचे आगमन होते. २८ डिसेंबरला पहिल्या ऑलिव्ह रिडले कासवाचे आगमन होऊन त्याने ६५ अंडी घातली.२९ डिसेंबरला दुसऱ्या सागरी कासवाचे आगमन होऊन त्याने १६५ अंडी घातली.

साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून सागरी कासवांचे आगमन अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर होत असते.ते काही वेळा हे महिन्यापर्यंत चालू असते. अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यासाठी सुमारे ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो.

आता गालजीबाग व आगोंद किनाऱ्यावर रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य सागरी कासवांच्या संवर्धनासाठी लाभत असल्याचे वन खात्याच्या दक्षिण गोवा सागरी विभागाचे उपक्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी सांगितले. दक्षिण गोव्याच्या वेगवेगळ्या किनाऱ्यावर सागरी कासवांनी अंडी घातल्यास संरक्षणासाठी त्यांचे स्थलांतर आगोंद‌ किंवा गालजीबाग किनाऱ्यावर करण्यात येते. गेल्या वर्षी आगोंद व गालजीबाग किनाऱ्यांवर २३१ कासवांचे आगमन झाले होते.

गेल्या वर्षी आले होते २३१ कासव

गालजीबाग येथे ४३ सागरी कासवांची ४१९२ अंडी घातली होती. त्यापैकी ३३५१ अंड्यातून पिल्ले बाहेर आली तर ४४८ अंडी नासली.२१९ पिल्ले मेली.आगोंद किनाऱ्यावर १८१ सागरी कासवांनी १७४०६ अंडी घातली होती.त्यापैकी ९४७३ अंड्यातून पिल्ले बाहेर आली ६५४० अंड्यातून पिल्ले बाहेर आलीच नाहीत.९१३ पिल्ले मरण पावली. त्याशिवाय अन्यत्र ७ सागरी कासवांनी ५८५ अंडी घातली त्यापैकी ४२९ अंड्यातून पिल्ले बाहेर आली. ११८ अंडी नासली तर ३८ पिल्लांना समुद्रात सोडण्यापूर्वीच मरण आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT