गोमन्तक डिजिटल टीम
राज्यातील समुद्रकिनारे हे कासव संवर्धनासाठी नैसर्गिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होत आहेत.
ऑलिव्ह रिडले कासवांनी यावर्षी गोवा राज्यातील यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
गोव्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांनी ४५,४९३ अंडी घातली आहेत.
२०२३ मधील हंगामात कासवांच्या घरट्यांमधून सुमारे १६,३१२ अंडी मिळाली होती.
यंदा घरट्यांमधील अंड्यांची संख्या ही दुपटीपेक्षा जास्त वाढल्याची आनंदाची बाब समोर आली आहे.
कासवांची स्मरणशक्ती दीर्घ असते. ते पुन्हा गोव्याच्या किनाऱ्यांवर परतले हा चांगला संकेत मानला जातो आहे.
अंडी उबण्यासाठी तयार होण्यापूर्वी ४५ दिवसांच्या चक्रातून जातात. घरट्यांची विक्रमी संख्या असूनही आव्हाने कायम आहेत कारण सर्व अंडी उबत नाहीत.
राज्याच्या कासव संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे, जनजागृतीमुळे, वन विभागामुळे तसेच स्थानिकांमुळे गोव्यात ऑलिव्ह रिडलेंच्या घरट्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली.