अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Scheme) गोवा आणि महाराष्ट्रातील (Goa And Maharashtra) युवकांची भरती करण्यासाठी कोल्हापूर आर्मी भरती कार्यालयामार्फत (Kolhapur Army Recruitment Office) 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या काळात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University, Kolhapur) क्रीडा मैदानावर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांना प्रवेशपत्र त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवले जाईल अशी माहिती पीआयबीने दिली आहे.
दरम्यान, अधिसूचनेत दिलेली कागदपत्रे (मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रांच्या पुरेशा प्रती, नमुन्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र, अधिवास, जात प्रमाणपत्र इत्यादी) ऑनलाईन नोंदणी करताना सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योग्यरित्या भरलेल्या शपथपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी मूलभूत वैद्यकीय पूर्व तपासणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटशी किंवा 0231-2605491 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भरती कार्यालयाने केले आहे.
नोंदणीबाबत खालील बाबी आणि कागदपत्रांची माहिती लक्षात ठेवा
05ऑगस्टपासून वेबसाईटवर अर्ज उपलब्ध झाले असून 03 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार.
संभाव्य उमेदवारांची त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तालुक्यानुसार तपासणी केली जाईल.
निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे कोविड लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक.
उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी केली जाईल.
प्रत्यक्ष निवड चाचणी घेण्याआधी तीन टप्प्यांमध्ये प्रवेशपत्रे स्कॅन केली जातील.
शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा) अशा टप्प्यांमध्ये या चाचण्या होतील.
शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असलेले उमेदवार 15 जानेवारी, 2023 रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) देतील.
अंतिम गुणवत्तेत निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील करून घेतले जाईल.
खालील पदांसाठी होणार भरती
अग्निवीर सामान्य सेवा (सर्व शाखा)
अग्निवीर तांत्रिक कर्मचारी
अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक
तांत्रिक विभाग/ वस्तुसूची व्यवस्थापन (सर्व शाखा)
अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण) (सर्व शाखा)
अग्निवीर कुशल कारागीर (सर्व शाखा) (आठवी उत्तीर्ण) (हाऊसकीपर आणि मेस कीपर)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.