गोविंद गावडे
गोविंद गावडेSandip Desai

Ponda: फोंडा परिसरात रात्र गस्त वाढविण्याची मंत्री गोविंद गावडे यांची पोलिसांना सूचना

Published on

फोंडा परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या चोरीच्या घटनेत अलिकडे वाढ झाल्याचे दिसून येते. यापार्श्वभूमीवर क्रिडा आणि कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी फोंडा पोलिसांना परिसरात रात्र गस्त वाढविण्याबाबत सुचना केली आहे.

याबाबत मंत्री गोविंद गावडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. फोंडाचे पोलिस निरीक्षक आणि गोव्याचे पोलिस उपाअधिक्षक यांच्याशी फोंड्यात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चर्चा झाली. मी त्यांना फोंडा परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याबाबत सूनचा केली आहे. तसेच, चोरीच्या घटनांचा सखोल तपास करण्याबाबत सूचना केली आहे. असे ट्विट गोविंद गावडे यांनी केले आहे.

दरम्यान, कुर्टी, फोंडा येथे सोनसाळखी हिसकावल्याची एक घटना आज समोर आली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली व घटनास्थळावरून पळ काढला.

गोविंद गावडे
मयडे येथे सुरू असलेल्या डोंगर पोखरण्याच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com