Tilari Dam  Dainik Gomantak
गोवा

Tilari Dam: भगीरथ प्रयत्नांनंतर आले तिळारीचे पाणी गोव्यात

दैनिक गोमन्तक

Tilari Dam: तिळारी धरणातील पाणी गोव्यात आणण्यासाठी जलसंपदा खात्याच्या गोवा व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना भगीरथ प्रयत्न करावे लागले. पाण्याखाली 48 मीटरवर अडकलेला 600 टन वजनाचा धरणाचा आपत्कालीन दरवाजा वर खेचण्यासाठी 40 अश्वशक्तीच्या मोटारीने हात टेकल्यानंतर अभियांत्रिकी ज्ञान पणाला लावत दरवाजा वर खेचण्यात आला.

त्यासाठी दरवाजावर दाब देणारे 20 हजार घनमीटर (2 कोटी लीटर) पाणी उपसावे लागले. दरवाजा नेमका कसा व कुठे अडकला, याची पाहणी करण्यासाठी दोन पाणबुडे आणावे लागले. एवढे सारे करूनही तीन दिवस आणि तीन रात्रींच्या प्रयत्नांनंतर आज (बुधवारी) सकाळी 5.45 वाजता दरवाजा पूर्ण उघडण्यात या अधिकाऱ्यांना यश आले.

यावेळी धरणाच्या ठिकाणी गोव्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, कार्यकारी अभियंता के. पी. नाईक पंचवाडकर, मिलींद गावडे, तर महाराष्‍ट्राचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव आणि त्यांचे पथक होते. कालव्याच्या दुरुस्तीसाठी 27 नोव्हेंबरला

तिळारी धरणाचा हा दरवाजा बंद करण्यात आला होता, तो आज सकाळी उघडण्यात आला. हे पाणी गुरुवारी (ता. २८) पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पोहोचल्यानंतर साळगाव, पर्वरीसह वेरे, नेरूल भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.

40 अश्वशक्तीची मोटारही कुचकामी

आपत्कालीन दरवाजा पाण्याखाली ४८ मीटरवर खाली उतरवण्यात आला. कालव्यांची दुरुस्ती झाल्यानंतर नाताळपूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी २३ डिसेंबरला धऱणाचा आपत्कालीन दरवाजा उघडून कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र, १२ हजार टन पाण्याचा दाब या दरवाजावर पडल्याने तो जागचा हलेना. ४० अश्वशक्तीच्या मोटारीलाही त्याने दाद दिली नाही, असे बदामी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT