Margao News: आणखी एक दुर्घटना होण्याची वाट पाहू नका : कुतिन्हो

Margao News: न्यू मार्केटमधील आगीची घटना पुन्हा एकदा येथील प्रतिनिधींना फायर हायड्रंट्स आणि मोकळे रस्ते आवश्यक आहेत याची आठवण करून देईल, अशी अपेक्षा शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केली.
Margao News
Margao NewsDainik Gomantak

Margao News: न्यू मार्केटमधील आगीची घटना पुन्हा एकदा येथील प्रतिनिधींना फायर हायड्रंट्स आणि मोकळे रस्ते आवश्यक आहेत याची आठवण करून देईल, अशी अपेक्षा शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केली.

Margao News
Margao Electricity: जुनाट वीज यंत्रणा बदला, व्यापाऱ्यांची मागणी

आमदार दिगंबर कामत आता वेळ वाया घालवणार नाहीत. ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालय, पालिका, साबांखा, अग्निशमन सेवा, पोलिस, पाणी पुरवठा, मार्केट असोसिएशन इत्यादींच्या सर्व प्रमुखांची बैठक बोलावून पाण्याची टाकी बसविण्यासाठी चर्चा करतील, असे कुतिन्हो उपहासाने म्हणाले.

त्यानंतर बैठकीत टाकीसाठी योग्य जागा शोधण्यासाठी तपासणी केली जाईल आणि अखेरीस संबंधित विभागांना ओव्हरहेड टाकीसाठी व्यवहार्यता अहवाल आणि अंदाज तयार करण्यास सांगितले जाईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मार्केट परिसरातील प्रत्येक आगीच्या घटनेनंतर हेच घडते आणि पुढील आगीची घटना अजून एक आठवण म्हणून येत नाही तोपर्यंत सर्व प्रस्ताव लवकरच विसरले जातात, असे ते म्हणाले.

अतिक्रमणांनी भरलेले अरुंद रस्ते, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना वेळेवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात याचे श्रेय आमच्या आमदाराला दिले जाऊ शकते, ज्यांनी उघडपणे अतिक्रमण करणाऱ्यांवर आपला जीव असल्याचा दावा केला आहे,

अशी टीका कुतिन्हो यांनी केली. मडगाव आजपर्यंत बऱ्यापैकी सुरक्षित आहे ते केवळ देवाच्या कृपेमुळेच, तथापि अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि अपयशामुळे एके दिवशी व्यापारी शहराचा नाश होईल आणि तेव्हा बसून रडायची वेळ येईल.

लोकप्रतिनिधींमुळे शहर कसे उद्ध्वस्त होत आहे, हे मडगावच्या जनतेला कळत नाही, तोपर्यंत कोणताही उपाय शक्य नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com