Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकल्याचा आरोप; पत्‍नीला पाच वर्षांनंतर जामीन

मित्रांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Crime News: आपल्या अनैतिक संबंधात बाधा येत असल्याने आपलाच पती बसवराज ऊर्फ बस्‍सू बर्की (38) याचा आपल्या मित्रांच्या साहाय्याने खून करून नंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोप असलेल्या कल्पना बर्की (31) हिला तब्बल पाच वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई उच्च न्यायालयाने काल जामिनावर मुक्त केले.

खून केल्‍यानंतर बसवराजच्‍या शरीराचे तुकडे पोत्‍यात भरून ते दुधसागर येथे फेकल्‍याचा आरोप असलेल्‍या पाच संशयित आरोपींपैकी कल्‍पना बर्की हिला अनेक अटी घालून 30 हजारांच्या जामिनावर सोडण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे.

खुनाची ही घटना 2 एप्रिल 2018 रोजी कुडचडे परिसरात घडली होती. मात्र हा प्रकार 8 एप्रिल रोजी उघडकीस आला होता.

मयताची पत्‍नी कल्‍पना बर्की (31), सुरेश कुमार सोळंकी (28, कुडचडे), अब्‍दुल करीम शेख (25, काकोडा), पंकज पवार (45, मडगाव) व आदित्‍य गफार (नवी दिल्‍ली) हे या खून प्रक़रणातील संशयित आरोपी आहेत.

अनैतिक संबंधातून काढला काटा

बसवराज याचा खून केल्‍यानंतर त्‍याच्‍या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्‍या गोणपाटात भरले व दूधसागर येथील घनदाट रानात फेकून दिले होते. बसवराज हा उत्तर गोव्‍यात टॅक्‍सीचालक म्‍हणून काम करीत होता आणि सुमारे 15 दिवसांनी तो कुडचडे येथे आपल्‍या पत्‍नीकडे यायचा.

आपल्‍या पत्‍नीचे अन्‍य कोणाशी सूत जमल्‍याचा संशय आल्‍यामुळे बसवराज व त्‍याच्‍या पत्‍नीचे नेहमी वाद व्‍हायचे. प्रेमात अडथळा ठरत असलेल्‍या आपल्‍या पतीचा काटा काढण्‍याचा निर्णय कल्‍पना बर्की हिने घेतला व आपल्‍या सहकाऱ्यांच्‍या साहाय्‍याने तो पूर्ण केला, असेही आरोपपत्रात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT